जुन्या काळातील रस्ते.
चाके जोडलेल्या वाहनांचा सर्रास व सर्वत्र उपयोग चालू होण्यापूर्वीच्या काळात माणसांच्या वर्दळीने तयार झालेल्या 'पायवाटा' किंवा 'पाऊलवाटा' हे प्रवास आणि दळणवळणाचे एक साधन होते. जुन्या काळात वाहन, पादचारी अथवा प्रवासी यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याच्या सोयीसाठी तयार करण्यात आलेले जमिनीवरील रस्ते म्हणजे मार्ग होतेच. रस्ते हे वेगवेगळ्या जनसमूहांतील दळणवळणाचे प्राथमिक व प्रधान साधन आहे, असे म्हणावे लागेल. आधुनिक 'हमरस्ता प्रणाली' ही एक प्राचीन रस्ता प्रणालीच्या नैसर्गिक वाढीतूनच निर्माण झालेली आहे. भारतातील रस्त्यांचा इतिहास खूप मोठा व रंजक आहे. त्यामुळे जुन्या काळात प्रवासासाठी किंवा वाहतुकीसाठी रस्त्यांचा विकास कसकसा होत गेला? लोक त्याचा वापर कसा करत? याची सविस्तर माहिती घेणे आवश्यक ठरते. दळणवळण/प्रवासासाठीच्या रस्त्यांचा इतिहास व विकास- अगदी प्राचीन काळातील व्यापाराचा विचार केला तर असे दिसून येते की आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सिंधू संस्कृतीच्या काळापासूनच भारतीय मालाची निर्यात होत असे. त्याचे शेकडो पुरावे उत्खननातून मिळाले आहेत. भारतातील रस्ते वाहतुकीचा/दळ...