मुंबईकर खरेच नशीबवान आहेत का?

अनेक वर्ष म्हणजे जन्मापासून मुंबई च्या एकदम जवळ म्हणजे प्रमुख मुंबई पासून १ तासावर राहत होतो आणि आता मुंबई मध्ये स्थायिक आहे .

मुंबई मध्ये फिरण्यासारख बघण्यासारखं बरच काही आहे . उदाहरणार्थ सुंदर असे अनेक समुद्रकिनारे जुहू अक्सा etc ( सुंदर आधी नव्हते पण आता आहेत असे म्हणू शकतो ), मेट्रो , मोनो, मुंबई लोकल, राणीची बाग , मरीन ड्राइव्ह , वांद्रे वरळी समुद्रसेतू , मॉल्स , चविष्ट जेवणासाठी सुंदर असे हॉटेल्स (अनेक छोटे पण फेमस असे फूड आउटलेटस् आहेत ) , हिंदी सिनेमातल्या कलाकारांची घरे , गेटवे ऑफ इंडिया, ताज, नरिमन पॉइंट , बोरिवली नॅशनल पार्क, जवळच एलिफंटा लेण्या आणि अश्या अनेक गोष्टी आहेत . सिद्धिविनायक मंदिर , मुंबा देवी , महालक्ष्मी मंदिर अशी अनेक धार्मिक स्थळे आहेत .

या सर्व ठिकाणांना खूप कमी खर्चात आणि अनेकांना अगदी मोफत भेट देता येते.

इथे उंचच उंच इमारती आहेत ज्यात उत्तम प्रतीची विदेशी इंटेरियर असलेली घरे आहेत .

करमणुकीसाठी कसलीच कमी इथे तुम्हाला जाणवणार नाही .

इथे खर्च करायला एका पेक्षा एक पर्याय आहेत .

नोकरी किंवा नवीन लहानसा धंदा चालू करायला इथे वाव आहे .

इथे उत्त्तम अश्या शिक्षणाच्या सुविधा आहेत .

इथे अनेक मोठ मोठे हॉस्पिटल्स आहेत जिथे अनेक गंभीर आजारांवर उपचार शक्य आहेत . उदाहरणार्थ कॅन्सरसाठी टाटा मेमोरियल हॉस्पिटल . कोकिलाबेन हॉस्पिटल .

मुंबई हून इतर शहरे रेल्वे ने आणि हवाई मार्गाने आणि इतर देश हवाई मार्गाने थेट जोडलेले आहेत त्यामुळे ती एक चांगली गोष्ट आहे .

बाहेर फिरायला ओला उबर ,घरी बसून हॉटेल फूड ऑर्डर करायला स्विगी Zomato , किराणा खरेदीसाठी डी- मार्ट , जियो मार्ट , ग्रॉफर्स , बिग बासकेट आहेत या सगळ्यामुळे काहीं पैसे एक्स्ट्रा मोजून जीवन आरामदायी आहे .

देशाची आर्थिक राजधानी आणि प्रमुख शहर असल्यामुळे इथे अनेक सोयी सुविधा इतर शहरांच्या मानाने खुप आधी उपलब्ध होत असतात.

इतर ठिकाणी सुधा या सगळ्या गोष्टी कमी अधिक प्रमाणात मिळतात पण मुंबई मध्ये सगळ्याच गोष्टी उपलब्ध होतात.

परंतु इथे राहणे म्हणजे नशीबवान समजण्यासारखे काही नाही असे मला वाटते .

कारण

इथले रोजचे जीवन खूप घाईचे आहे . मुंबई रोज सकाळ पासून ते रात्री पर्यन्त संपूर्ण व्यस्त असते . आपल्या कामाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी सगळ्यांना खूप धावपळीचा सामना करावा लागतो . लोकल चा प्रवास म्हणजे जीव मुठीत घेऊनच तो . काही मार्गांवर ( चर्चगेट - विरार , छत्रपती शिवाजी टर्मिनस - बदलापूर ) रोजचा प्रवास म्हणजे घरून ऑफिस आणि ऑफिस मधून पुन्हा घरी सुखरूप पोहोचलो म्हणजे नशीब .

बेस्ट बस ही नावाने बेस्ट आहे पण कामाच्या दिवसात या बसेस पूर्ण भरभरून गर्दी वाहत चालू असतात. बस थांब्यावर बराच वेळ वाट पाहून आलेल्या बस मध्ये आत शिरायला तरी जागा मिळाली तरी खूप.

पावसाळ्यात होणारी मुंबईची वाईट परीस्थिती तर सगळ्यांना माहीत आहेच .

इथली सामान्य माणसांना परवडणारी घरे ही बऱ्यापैकी लहान आणि फक्त वेळ काढण्यासाठी असतात . मोठ्या घरांसाठी करोडो मोजवेच लागतात .

बराचसा कामगार वर्ग तर अगदी १०×१० च्या खोलीत दाटिने राहतो.

इथे प्रत्येक जण आपल्या आयुष्यात आपल्या कामात मग्न असतो . मग ते नोकरी / धंदा असो किंवा शिक्षण .

इथल्या कित्येक लोकांनी आपले फार्म हाऊस / बंगले मुंबईच्या बाहेरच्या बाजूला शांत ठिकाणी घेऊन ठेवलेत . रिटायरमेंट नंतर कित्येकांना आपले उर्वरित आयुष्य हे या सगळ्या धावपळीतून , प्रदूषणातून बाहेर शांत आणि छान अश्या ठिकाणी असावे असे वाटत असते .

कायम साठी इथे सेटल व्हायचा विचार क्वचितच कुणी करत असेल . ( काही उचभ्रू लोक आणि त्या वस्ती सोडल्या तर )

( सोर्स : गूगल फोटो )

डाव्या बाजूस घाटकोपर आणि उजव्या बाजूस हिरानंदानी ही असमानता इथे दिसते.

थोडक्यात दुरून डोंगर साजरे अशी गोष्ट आहे ही .

फिरण्यासाठी जसे पुणे बंगलोर , गंगटोक , सिक्कीम , दिल्ली , पंजाब , केरळ इत्यादी सगळे जसे छान आहेत तसेच मुंबई पण त्यातलेच .

पर्यटक म्हणून मुंबई ला आयुष्यात एकदा तरी नक्की या आणि आनंद घ्या मुंबईचा . तुमच्यासाठी मुंबई नक्कीच एक छान अनुभव देईल.

आणि हो अगदी सेफ आहे मुंबई … सो मित्रांसोबत , मैत्रिणीसोबत किंवा कुटुंबासोबत कसेही कधीही या .

Comments

Popular posts from this blog

कोळंबी च्या रेसिपी

मुंबई मधील मराठी माणूस

बिटकॉइन चे फायदे आणि तोटे.