मृत्यूनंतर काय होते?

प्रश्न रोमांचित करणारा आहे . कारण माझ्या स्वतः चा अपघात होऊन कराव्या लागणाऱ्या शस्त्रक्रिया कालावधीत जीवन मृत्युच्या उंबरठ्यावरची छोटीसी अद्भुत अनुभूती सह मृत्यूनंतर जिवंत झालेल्या एक मावस आजी व दुसरी काकू यांच्या तोंडून मी स्वतः ऐकलेल्या सत्यघटना घडलेल्या आहेत ! माझा अनुभव त्यांनी काय पाहिले हे त्यांच्याकडून जाणून घेतले त्याविषयी उत्तरात दिले आहे !

याबाबतीत देशी व विदेशी तुरळक घटना घडल्या आहेत. यात निम मृत्यूचे वेळी बहुतेकांनी एका बोगद्यासम पोकळीतुन उजेड दिसतो , त्यातून पुढे जात असताना पोकळी संपण्या अगोदरच जिवंत झाल्याचे सांगितले आहे . पण स्वर्गात गेल्यावर तिथे काय पाहिले यावर क्वचितच कुणी सांगितले.

स्वतःची अद्भुत अनुभूती :

मला २००५ साली मोटारसायकल वर कार्यालयात जाताना हौसेने चालकाला बाजूला बसवून नवी टाटा सुमो गाडी शिकणाऱ्या कृषी विद्यापीठातील प्रा. एल व्ही घरटे साहेबांच्या किशोरवयीन चिरंजीवाने संकेत न देता अचानक गाडी वळविल्याने मी ती गाडी चुकवता चुकवता मोटारसायकलच्या मागील बाजूस धडक बसली. डाव्या हाताच्या मनगटाच्या पूर्वी एकदा मोडलेली दोन्ही हाडे जुळल्यावर त्याच्याच मागे परत तीच हाडे मोडली. मागचा चांगला अनुभव म्हणून राहुरीचे डॉ घोरपडे हॉस्पिटलमध्ये जोडणी साठी भूल देऊन एक तासाच्या शास्त्रक्रियेस साडे तीन तास लागले ! किंचित काही सेकंद शुद्ध येऊ लागतात पायांच्या अंगठ्यास बहुधा दुसऱ्यांदा भूल साठी इंजेक्शन दिल्याच अस्पष्ट आठवत. बेभान असताना मला एका प्रकाशमय बोगद्यातून सुमारे ३०'-४०' अंतरावर हाताच्या मूठी एवढी अंडाकृती एल इ डी च्या लख्ख प्रकाशा सारखी महाप्रखर सफेद आकृती माझेकडे येइ व परत मागे जाई . मला शस्त्रक्रिया झाल्याचे आठवत नव्हते व कसल्याही वेदना तर जाणवत नव्हत्याच वरून मी अती प्रसन्न मनाने लख्ख आकृतीचे अवलोकन करत होतो. कोणीही समोर न दिसता परत यायचे का असा प्रश्न ऐकू येई ! मला तो आत्मा असावा अस वाटे ! तिथे मी आहे हे मला जाणवायचे पण माझ अस्तित्व स्वतः कडे पाहील्यावर जसा गडद अंधारात शरीर दिसत नाही तसच शारीरिक अस्तित्व नसल्याच तिथे उजेडात जाणवत होत . पण तो कुणाचा आत्मा असावा हा संभ्रम असल्याने तू कोण व कुठे आहे ? असा प्रतिप्रश्न केला तर ती महातेजस्वी आकृती हळुवार जवळ येत ५-७ फुटाच्या अंतरावर येऊन थांबली ! परत आवाज आला शरीर बदलायचे का ? मग मी थोडा गांगरलो ! सध्या आपल्या कुटुंबियांना आपली गरज आहे असा विचार करून सहज सावरत शांतपणे अजून नको अस सांगितले ! तरी ती आकृती किंचित मागे पुढे करत तिथेच घुटमळत राहिली !माझच शरीर मला दिसत नसल्याने तो माझा आत्मा शरिराबाहेर पडलेला माझाच आत्मा आहे यावर माझा विश्वास बसू लागला ! तर परत प्रश्न आला मग बदलू या का शरीर ? मी परत नको नको म्हटल ! मग बोगद्यातून प्रकाशझोत येऊ लागला व मला तो क्षण जीवनात कधी नाही इतक आल्हादीत व महा प्रसन्न वाटत होता ! मग ती आकृती आणखी जवळ येऊन गायब झाली ! माझी भूल उतरल्यावर शुद्ध आली. तेव्हा मला प्रचंड जीवघेन्या यातना होत ओ माय गॉड ओ माय गॉड अशी सारखी बडबड करत हात आपटत होतो ! बर वाटायला लागल्यावर १८००० ₹ बिल जास्त झाले असे मी डॉ ना स्मित करत म्हटल तर ते गोड सुस्वभावी डॉ स्मित करत म्हणाले "काका तुमचा बी पी खूप कमी होऊन तुमची स्थिती गंभिर झाली होती , १ तासाची शस्रक्रिया साडे तीन तास चालली ! आम्ही समोर लक्ष ठेऊन दुसर काहीही केले नाही. तुमचा बी पी व्यवस्थित होईपर्यंत आम्ही बसुन होतो". बहुतेक दुसरी भूल जास्त झाली असावी अस मला वाटत ! प्रत्यक्षात हाथ खूपच दुखत असताना मला त्या गंभीर स्थितीत यातना न जाणवता जीवनात कधी नाही एवढे खूप खूप प्रसन्न का वाटत होते ? ती नेमकी जीवन मृत्यूच्या उंबरठ्यावरची स्थिती असावी. तेव्हा एक दिव्य शक्ती जागृत होऊन माझी जगण्याची इच्छाशक्ती बघून माझाच दिव्य आत्मा मलाच शरीर बदलायचे का असा प्रश्न करत घुटमळत त्या पोकाळीत थोडा आत जाऊन परत आला असावा. अशाच प्रकारचा लख्ख प्रकाश माझ्या आईच्या शेवटच्या श्वासाचे वेळी तिला पलंगावरून भुईवर घेताच डोळ्यातून बाहेर पडताना आम्ही सर्वांनी पाहिला होता . माझ्याच आत्म्याला तू कोण म्हणून प्रश्न विचारल्यामुळेच मला त्याचे उत्तर मिळत नसावे ! असा हा दुर्मीळ अद्भुत जीवन मरणाच्या उंबरठ्यावरच्या प्रसंगाची अनुभूती देण्यासाठी परमेश्वराने प्रा. घरटे साहेबांना लाखो ₹ खर्च करायला लावून नवी गाडी घ्यायला लावली व धुळ्याहून अपघातासाठी त्यांच्या गाडी शिकायाची हौस असलेल्या मुलाला मला धडक देण्यासाठी राहुरीस पाठवले ! अशी ही दैवी शक्तीची अगाध लिला आहे !

तारुण्यात देवी गावची मृत्यू होऊन जिवंत झाली होती आईची मंजा मावशी। :

मृत्यू नंतर जिवंत झाल्याची माझ्या आईच्या देवी (चिचखेडा ) , जिल्हा धुळे येथील श्री जालम लाला पाटील यांची पत्नी , पारोळा तालुक्यातील टोळी येथील नामदेव फकिरा पाटील यांची बहिण आणि माझ्या आईच्या सख्या मंजा नावाच्या मावशी म्हणजे माझी मावस आजीची सत्य घटनेची तिला स्वतः भेटून खात्री केलेली आहे . मंजा आजीची ही दुर्लभ विस्मयीत अनुभूती मला मी ८ वर्षाचा असताना माझ्या आईने १९६२ चे दरम्यान सांगितली होती. तेव्हापासून मला त्या जिवंत झालेल्या आजीस भेटायची तीव्र जिज्ञासा होती. त्यानंतर ३-४ वर्षात तरडीस माझ्या लहान मामाचे लग्नाला आईबरोबर गेलो असता रंगरूपाणे देखनी भारदस्त व्यक्तमत्व वाली माझ्या संख्या आजी सारखी दिसणाऱ्या मावस आजींना पाहून मी थक्क झालो . आईस विचारून ती तीच मरून जिवंत झालेली देवीची मंजा आजी असल्याची खात्री केली. आईला बळजबरीने तिच्या जवळ नेले ! आईने त्या आजीशी ओळख केल्यावर तिने अत्यन्त मायेने कुरुवाळताच माझी हिम्मत वाढली !

मी म्हटल आजी तू खरच स्वर्गात गेली होती ? अस विचारताच आजी व आई सह ज्यांनी ऐकल ते खदाखदा हसु लागली ! आजीने मला जवळ घेत पाठीवर मायाळू हात ठेऊन हो म्हटल !

"मग तू तिथे कशी गेली व काय पाहिल ?" मी विचारले तर सर्व दाटीवाटीने आजीकडे जवळ सरकले . आजी सांगू लागली , " मी २०-२२ वर्षाची असेल ! त्या दिवशी सकाळी १० वाजेच्या सुमारास आंघोळ नित्य कामे आवरून मी टोपलीतला केर बाहेर टाकून घरात शिरले . माझ्या डोळ्यासमोर अचानक अंधारी येऊन चक्कर आला मी खाटेवर बसत आई आई ओरडली व बेभान होऊ लागतात माझ्याभोवती गराडा झाला . ठाण कन आवाज आला व मी स्वतःला खाटेवर पडलेली पाहत होती. घराबाहेर गावकऱ्यांनी अंगण खचाखच भरले ! कोणीतरी नाडी पाहून नकारार्थी मान हलविली ! रडारडी सुरू झाली. मी आहे पण माझ शरीर खाटेवर व मी अलग आहे अस वाटे . मला माझी काही वर्षांपूर्वी वारलेल्या आजीने व एक अनोळखी पुरुष जो यमदूत असावा माझ्या बाजूला दिसले त्याने चल असे खुणावताच आजीने मायेने हात धरून सो सो सो आवाज होत डोळ्यावर झापड असताना अगोदर सुंदर स्वर्गाबद्दल ऐकले तशाच रम्य प्रशस्त ठिकाणी नेले ! तेथे काही तास झाले बरोबरीच्या यमदूताने आजीला जाण्यास खुणावले ती खिन्न होऊन गेली ! तिथे कमालीची शांतता व अति प्रसन्न वातावरण होते . मी अगोदर स्वर्गाबद्दल ऐकले होते व मला कल्पना आली की आपण बहुतेक स्वर्गवासी झालो . तरी खात्री साठी मी गांगरून खाली पाहिले तर घराजवळ तुफान गर्दी दिसली ! मला आंघोळ घालत अंत्ययात्रेची तयारी पाहून मी थोडी भेदरली पण तिथे खूप प्रसन्न ही वाटे ! संसार नुकताच सुरू झाला होता व हे अस याच वाईट ही वाटे ! आजीला नजर शोधू लागली तर लोक इकडे तिकडे जाताना काहीतरी कामे करत होती काहींना ओढून नेत होते ! आजी दिसेना . मग राजेशाही काळे कपडे घातलेले यमराज व यमदूत माझ्याकडे पाहत काहीतरी चूक झालेच्या अविर्भावात हळुवार कुजबुजले ! तेवढ्यात स्मित करत आजी जवळ आली व वापस जायचे अशी देहबोली केली ! मी तिथे काय काय दिसते ते न्याहाळू लागताच यमदूत भरभर जवळ येऊन तिकडे पाहू नको असे खुणावून मला घाईत कमरेजवळ जोरात धक्का दिला व अंगणात आजीबरोबर आली ! आपण परत पूर्ववत होणार याची मला खात्री झाली ! सर्व पायाकडून शेवटच दर्शन घेत होते ! आई बहिणी आकांत करत होत्या ! आजीने माझे प्रेताचे माथ्यावर हात ठेवला व गायब झाली . पायाचा अंगठा हळू लागल्याच दर्शन घेणार्यांच्या लक्षात आला ! मी डोळे उघडले ! सर्वत्र कुजबुज व चेहरे फुलले ! माझ अंग व कमर खूप दुखत मी विव्हळत होते ! ऐन तरुणाईत जाऊन मी जिवंत झाले होते.

मला अर्धवट घट्ट बांधल्याच व कमरेत बसलेल्या जोराच्या धक्क्याने खुप वेदना होऊ लागल्याच जाणवू लागले ! मी डोळे उघडले व पाहते तो पटापट बरेच जनांनी खुशीने मला किडीवरून उचलून घरात नेत खाटेवर टाकले ! सर्वच खूप आनंदात होते . आईने उठवून बसविले , बहिणी तुफान खुश होऊन कुजबुजत होत्या ! माझे पती तर खुशीने सुन्न झाले होते. तेव्हा ज्या खाटेवर जीव गेला ती खाटच नको म्हणून त्यांनी मला उठवले ती खाट उचलून अंगणात भिरकावून फेकली ! सर्व विचित्र व अविश्वसनीय वाटत होते ! गर्दी कमी झाली . लोक खुशीत परत गेले ! आईने मला मोरीत नेऊन अंघोळ करायला लावली . मिर्या करून लुगड नेसवून घेतल माझ अंग दुखत होत ! तेवढ्यात परत लोक गलीत पळू लागले . तपास केल्यावर समजले गावातली मंजुबाई आजी वारली ! तेव्हा लक्षात आले की त्या आजींच्या जागी चुकून नावाच्या घोळामुळे मला स्वर्गाचे दर्शन झाले ! पण तेथे सविस्तर काय होते ते मी पाहायचा प्रयत्न करत असल्याचे त्यांच्या लक्षात येताच मला घाईत खाली लोटले ! तेव्हापासून मला उपाचार करूनही कमरदुखीचा त्रास आहे भाऊ अस हासत माझ्या पाठीवर हलकी थाप मारत ती आजी म्हणाली ! त्यानंतर ती आजी ५० वर्षे जगली होती .

लहानपणीच शेवंता काकू आनंदमय स्वर्गाचे दर्शन करून आल्या होत्या :

तिसरी घटना आमच्या रोजच्याच शेवंता काकूंच्या लहानपणी वारल्यावर परत जिवंत झाल्याची आहे! तीच माहेर धुळे तालुक्यातील निमगूळचे होते ! तिच्या मोठया भावाचे नाव चैत्राम सोनवणे व काकू भावाच्या पाठची होती ! तिच्या या विसमयकरक अनुभवा आधारित मी स्वतः तिची मुलाखत घेतली होती ! ती अशी :

मी : काकू तू स्वर्गात गेलिस तेव्हा केवढी होती ?

काकू: मी ८-९ वर्षाची असताना रंगीत पाळण्यात झोपली असताना स्वर्गात गेली होती !

मी: तू तिथे कशी पोहोचली ?

काकू : पावसाळ्याचे दिवस होते ! संध्याकाळी मुसळधार पाऊस सुरु झाला. पाऊस काही थांबेना. रात्री १० चे सुमारास माझे एक नेहमीच्या ओळखीचे वारलेले चुलत आजोबा व अजून एक अनोळखी व्यक्ती (यमदूत असेल) मला प्रेमाणे पालखीत घेऊन गेलेत !

मी : तिथे काय पाहिले ?

काकू : तिथे खूप लांब एक राजा व एक व्यक्ती मोठया लांब जाड वहीत काहीतरी पाहत होते. त्यांचे समोर लाल गालिच्यावर रांगेत काही मूल मुली बायका मानस वृद्ध बसलेली होती . ते दोघे त्यांच्यातील एकेका कडे व वहीत पाहत काहीतरी बोलत होती !

मी : तुम्ही काय करत होता ?

काकू : मला तिथे नेल्यावर ओळखीचे आजोबा माझे डोक्यावर हात ठेवून शिस्तीत उभे होते . मी इकडे तिकडे पाहिले तर तिथे छान छान कपडे घातलेले मूल आपापल्या छोट्या छोट्या टोपलीत खूप सुंदर फुल भरून रांगेत चालत कुठेतरी नेत होती ! मी ही फुल भरून नेऊ का अस खुणेने आजोबांना विचारल तर त्यांनी खुणेनेच थांब अस सांगितले . तेवढ्यात मधुर घंटा वाजु लागली व सर्व मुले शिस्तीत रांगा करून बसली . सुंदर गोंडस मुलांनी वाट्या आणल्या व प्रत्येकाला १-१ वाटी दिली व नंतर त्यात खीर वाढली . मूल ती खीर चारही बोटांनी चाटत होती . मूल बोलायला लागली की तेथील एक देवी त्यांच्यावर हसत डोळे मिचकावत होठावर बोट ठेऊन गप्प राहण्याचे संकेत करी ! सर्व काही अतिप्रसन्न आल्हादीत , खूप सुंदर . असा बराच वेळ गेला ! माझ्या जवळपास अजून काही छान छान मूल दिसली . आम्हाला पण मऊ मऊ गालिच्यावर रांगेत बसवल. तोच राजा माझ्याकडे आजोबांबरोबर आलेल्या यमदूतावर डोळे वटारून कुजबूजु लागला ! यमदूत वाकून म्हणाला प्रभू ही शेवंता ! पण देवदूतास राज्याने काहीतरी समज दिली ते ऐकून आदराने होकारार्थी मान हलवली ! माझ्या जवळच्या बाबांना खुणावून जायला सांगितले व दुसरी एक महिला हसत आमच्या जवळ आली ! मला ती हसत म्हणाली चल परत ! काय चालले मला काहीच कळेना .

मी: जिज्ञासेने मी व बरोबरीचे इतरांनी एका आवाजात विचारले पुढे काय झाले !

काकू : सकाळी ८ चे दरम्यान माझेबरोबर आलेले देवदूत व ती एक अनोळखी महिला गायब झाले . मी आमचे निमगूळ गावातील घरात स्वतःला पाळण्यात झोपलेली पाहत होती . आजू बाजूला घरभर महिला दुःखाने व्याकुळ दिसत होत्या तर आई पाळण्यातुन मला थोड उचलून हंबरडा फोडून रडत होती ! वडील भिंतीशी बसून उपरण लावून व त्यांचे जवळ भाऊ चैत्राम हुंदकत होते ! मला काही कळेना मी आईला मिठी मारली व जोरजोरात भेदरून रडू लागली ! पण मी रडते व तिला मिठी मारली आहे हे आईला व कोणालाही कळेना ! तो पर्यंत दोन तीन मानस आली व पाळण्यातुन मला उचलून न्यायला लागलीत . आई बेभान होऊन टाहो फोडू लागली नका नेऊ हो देव एवढा निष्ठुर नाही माझी बाळी झोपली आहे , माझा आत्माराजा सांगतो ती उठेल हो थांबा ना ! तिने त्याच्या हातातून ओढून उराशी लपटवत तोंडात तोंड घालत आकांताने विव्हळत माझी बचे शेवंता , माझी सोना ताई , माझी बाई माझ्याशी बोल ना तुझ्यासाठी बघ बाबांनी नवी गौराई करून आणली! सर्व घर व वातावरण दुःखाने ओतप्रोत झाले ! अचानक आई आनंदाने गदगदून माझे मुके घेऊ लागली ! बघा बघा माझी बाई जागी झाली ! सर्वत्र चमत्कार झालेने दुःख विरून आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या ! जो तो खात्री करायला आमच्या जवळ येऊन दर्शन घेऊन आश्चर्य चकित होऊन खुशीने वापस जात होता ! हळू हळू गर्दी कमी झाली ! मी आईला विचारल काय झाल होत ग ? "मला पोटाशी घेत काही नाही काही नाही म्हणाली!" तोच कुजबुज सुरू झाली ! गावातली एक वृद्धा वारली अस सांगू लागले ! मी ओट्यावरून पाहिले परत रडण्याचे आवाज ऐकू येत होते ! मी आईला परत विचारले अग आज लोक अस काय करत आहेत? ती मला घरात नेत म्हणाली "अग ती आजारी शांता ताई होती ना ती वारली !"

मी : म्हणजे शेवंता काकू तू जिवंत झाली व ती लगेच आजारी शांता ताई वारली !

काकू : अरे दादा नाव सारख वाटल्याने यमदूत तिच्या ऐवजी मलाच घेऊन गेले होते व म्हणून परत आली हे मला नंतर कळु लागल ! मला घ्यायला तु ओळखीचे वारले बाबा आले व तिला घ्यायला ती महिला यमदूता बरोबर आली असेल भाऊ ! (काकूंचा हयात लहान मुलगा श्री. भास्कर नामदेव कदम. 

या दोन्ही महिलांच्या तोंडून ऐकलेल्या मृत्यूनंतर जिवंत झाल्याच्या सत्यघटना ऐकून कोणीही संभ्रमात पडेल ! पण मंजाच्या बदल्यात मंजुबाई व शेवंता च्या बदल्यात शांता गेल्याच्या निसंदिग्ध पुराव्या मुळे याची सत्यता नाकारायचा कितीही प्रयत्न केला तरी नाकारुच शकत नाही ! कदाचित त्यांच्या सांगण्या समजण्यात अधिक उणे असू शकते! गरुड पुराणात स्वर्ग किती अंतरावर आहे , तिथली कार्यपद्धती काय याबद्दल जी माहीती आहे त्याच्याशी येथे नमूद केलेले वैयक्तिक अनुभव काही प्रमाणात जुळतात व काही बाबी नवीन वाटतात ! आदीगुरु शंकराचार्य यांचा शरीर बदलांची घटना ही येथील अनुभवाची कुठेतरी पूष्टी करते !

या लेखातील सत्य घटना आधारीत निष्कर्ष :

१) मृत्यूनंतर जातकास दिव्य दृष्टी येते ! तो दूरचे भिंती आडचे पण दिसू शकते . जीवन मरणाच्या उंबरठ्यावर मूठी एवढा तेजस्वी आत्मा आत्मा प्रकाशमय पोकळीतून ये जा करतो व आपल्या परवानगी शिवाय शरीर कायमस्वरूपी शरीर सोडत नाही . कदाचित तो प्रकाशमय पोकलीतून पुढे गेल्यावर शरीर सोडत नसावा .

२) आत्म्यास घेण्यासाठी यमदूत सोबत ओळखीचे कोणीतरी येत असावे ! शरीर सोडल्यावर स्वतः च शारीरिक अस्तित्व जाणवत नाही पण निर्जीव शरीर दिसते .

३) नावाच्या घोळाच्या चुका स्वर्गात ही होतात व त्या दुरुस्त केल्या जातात .

४) स्वर्गात अतिप्रसन्न व आबालवृद्ध तरुणांसाठी कमालीचे , शांत , शिस्तबद्ध वातावरण असते . म्हणून स्वर्गाचे सुख व आनंदाची अपेक्षा केली जाते.

५) मृत्यूची आयुष्य भर भीती वाटते. पण मृत्यनंतर स्वर्गाचे मंगलमय वातावरण आत्म्यास आल्हादीत करते ! मोक्षप्राप्त जीवात्मे सतत अस्तित्वात असतात व महत्वाचे वेळी स्वप्नात येऊन सांकेतिक मार्गदर्शन करतात. मृत्यूनंतर एका आत्म्यास स्वतःच शाररिक अस्तित्व जाणवत नाही पण इतर आत्म्यांचे तस अस्तित्व त्यास व त्याचे शारीरिक अस्तित्व इतर आत्म्यास जाणवते व ते जिवंत असताना ओळखायचे तस ओळखतात ! पण तिथे बोलायची मुभा असते व जास्तीत जास्त सांकेतिक भाषा वापरली जाते. हे मी माझे आईला मी स्वप्नात आल्यावर विचारल्यावर तिथे कामे करावी लागतात व एक बाबा एकमेकांना बोलू देत नाही असे सांगितले होते ! असच एक रोजचा मित्र स्वप्नात आल्यावर मी त्याला वर स्वर्गात काय आहे अस विचारल्यावर त्याने मी अजून वर गेलोच नाही अस अनपेक्षित धक्कादायक उत्तर दिले ! सकाळी उठल्यावर याबद्दल हयात वडिलांना विचारले तर ते म्हणाले जे अपघात ,आत्महत्या , खून मुळे अनपेक्षित अवेळी दगावतात त्यांना १२ वर्षे स्वर्गाचा दरवाजा बंद असतो अस सांगतात ऐकून त्याच्या उत्तराचा अर्थ समजला ! तस आत्मे शरीर सोडायची मानसिकता झालेशिवाय बाहेर पडत नाहीत पण अपघाताचे बाबतीत मात्र छिन्न भिन्न शरीर पाहून जगण्यात अर्थ नाही अशी स्थिति निर्माण झाल्याने संबंधित आत्म्यास शरीर सोडनेच सोयीचे वाटत असावे !

सर्वात महत्त्वाचे मानसिक दृष्टीने मरणासन्न व्यक्तीचा आत्मा जोपर्यंत शरीर सोडायची परवानगी देत किवा निर्णय घेत नाही तोपर्यंत आत्मा शरीर सोडत नाही . ही अनुभूती आतापर्यंत करोडो आप्तेष्ठांनी ,मित्रांनी , सहकाऱ्यांना त्यांच्या जवळीक असलेल्या व्यक्तीचे अंतिम समयी कोणातरी खूप लांबून येणाऱ्या जिवलग व्यक्तीची भेटीसाठी वाट पाहत जीव धरून ठेवल्याचे व ती व्यक्ती येताच किवा तिने मांडी देऊन तोंडात पाणी टाकताच इहलोक सोडल्याचे पूर्वापार सतत अनुभव येत आहेत !

मग आत्मा परवानगी किवा मानसिकता झाले शिवाय शरीर सोडत नसेल व अति मंगलमय आल्हादीत नयनरम्य शिस्तबद्ध शांत वातावरणात तिथे गेलेले जिवलग कोणी ना कोणी ज्यांच्यासाठी आपण रडलो आहोत असे प्राणप्रिय भेटनारच असल्यावर मृत्युचे भय सोडून आनंदाने मरायची मानसिक तयारी ठेवली की आहे ते सध्याचे जीवन खूप खूप आनंदाने जगता येईल !

सर्वांना कुटुंबिय समवेत मृत्यू भय विरहित सुखी समृद्ध आनंदमय प्रगतिशील महत्वाकांक्षा पुर्ती शतायुषी जीवनासाठी अगणिक हार्दिक शुभेच्छा !

जय श्री स्वामी समर्थ, जय सीता राम । राधे कृष्ण। 🙏🏾🙏🏾🙏🏾🌹

Comments

Popular posts from this blog

कोळंबी च्या रेसिपी

मुंबई मधील मराठी माणूस

बिटकॉइन चे फायदे आणि तोटे.