ब्रेव ब्राऊजर-तुम्हाला पैसे कमवून देणारा ब्रॉउजर
ब्रेव ब्राऊजर हे नव्याने आलेले अँन्ड्रॉईड ब्राऊजर आहे ते सुद्धा फ्री आहे. ब्रेव ब्राऊजर हे क्रोम आणि फायरफॉक्स पेक्षा 3 पट फास्ट चालते. प्ले स्टोरवरुन इंस्टॉल करायचे असल्यास त्याची साइज 71 mb आहे. रेटिंग 4.6 आहे व 10 मिलियन पेक्षा जास्त वेळा डाऊनलोड केलेले गेले आहे. ब्रेव ब्राऊजर हे 2016 मध्ये लॉंच करण्यात आलेले आहे.
- ब्रेव ब्राऊजर Windows, MacOS, Linux, Android, iOS या सर्व ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो.
- याचे खूप प्रकारचे फीचर्स आहेत जसे की या ब्राऊजरमध्ये जाहिराती ब्लॉकर (ad blocker) आधीपासून बनवले गेले आहे. तसेच हे थर्ड पार्टी कूकीसला व स्क्रिपट्सला ब्लॉक करते.
- इन बिल्ट ब्लॉकर (in built blocker) असल्याने तुम्ही फ्रीली ब्राउस करू शकता कोणीच तुम्हाला ट्रॅक करू नाही शकत. याशिवाय तुम्ही ब्लॉक केलेल्या माहितीला ट्रॅक सुद्धा करू शकता.
- हे ब्राऊजर तुम्हाला 20 पेक्षा जास्त सर्च इंजिन देतो. तुम्ही तुमच्या आवडीनुसार निवडू शकता.
- हे ब्राऊजर सुद्धा ओपन सोर्स (open source) आणि क्रोमियम आधारित आहे. तुम्ही एखाद्या आवडत्या साइटला बूकमार्क करून एड करू शकता.
- कोणत्याही वेबसाइटचे लॉगिन पासवर्ड, एक्सटेन्शन, हिस्टरी मॅनेज करतो तसेच इनकोगनिटो (incognito) मोड सारखे फीचर देतो.
- या ब्राऊजरची खासियत म्हणजे फ्री असले तरी कोणतेच जाहिराती दाखवत नाही. याचे खूप पावरफुल असे नॅविगेशन आणि अडवांस सेक्युर्टी फीचर्स (Advance security features) आहेत.
- येथे युजर ठरवू शकतात म्हणजे त्यांना कशा प्रकारच्या जाहिराती बघायच्या आहेत आणि जर एखादी माहिती दाखवायची असल्यास ब्राऊजरला कळवावे लागेल.
- ब्रेव ब्राऊजरने वचन दिले आहे की यूजरला 70% जाहिरातीद्वारे रिवॉर्ड म्हणजेच बक्षीस मिळणार आहेत म्हणजेच तुमच्या निवडीनुसार जाहिरातीवर क्लिक करून रिवॉर्ड मिळवू शकता.
- ब्रेव ब्राऊजर अर्थव्यवस्थेच्या बाबतीत उपयोगी आहे. ब्रेव ब्राऊजर रिवॉर्ड सिस्टम जे तुमच्या ब्राऊजर वापरण्यावरुन तुम्हाला पेमेंट्स देते. म्हणजेच जुन्या ब्राऊजरवरुन तुम्हाला पैसे कमवण्यासाठी तुम्हाला 3 rd. पार्टी ब्राऊजरला माहिती द्यावी लागते आणि त्रासदायक जाहिराती बघावी लागते, पण ब्रेव ब्राऊजर तुम्हाला ब्राउस करताना टोकन देते.
- महिन्याच्या शेवटी ब्रेव जितका वेळ तुम्ही प्रत्येक साइटवर घालवला आहे त्यावर आधारित आपोआप टोकेनचे वाटप करते. जर तुम्हाला ती साइट आवडली नसल्यास लिस्ट मधून काढून टाकू शकता.
Comments
Post a Comment