थोडेसे मनोरंजक फॅक्टस.
माझ्या माहितीतील काही मनोरंजक आणि आश्चर्यजनक तथ्ये.
- पहिल्यांदा चंद्रावर जाण्याचा पराक्रम करणाऱ्या अपोलो अभियानाच्या अंतराळवीरांनी अपोलो मोहिमे आधी शेकडो स्वाक्षऱ्या (ऑटोग्राफ) कागदावर करून ठेवल्या होत्या. कारण त्यांना ज्या प्रचंड धोक्याचा सामना करावा लागणार होता त्यामुळे ते जीवन विमा पॉलिसी काढू शकले नाहीत. त्याऐवजी, त्यांनी शेकडो ऑटोग्राफवर स्वाक्षरी केली, जे त्यांच्या कुटुंबीयांनी ते घरी न आणल्यास विक्री करु शकले असते. सुदैवाने, त्या जीवन विमा ऑटोग्राफची आवश्यकता भासली नाही. पण जर ते ऑटोग्राफ विकावे लागले असते तर त्यांची किंमत आजच्या पैशांच्या तुलनेत $३०,००० म्हणजे भारतीय रुपयांत जवळपास २१८७३१४ एवढी असती.
- १९९५ मध्ये ख्रिसमससाठी घरी स्वयंपाक करताना स्वीडनमधील एका महिलेने आपल्या लग्नाची अंगठी गमावली. तिने अंगठीचा घरात सर्वत्र शोध घेतला, पण २०१२ पर्यंत तीला ती सापडली नाही. 16 वर्षांनंतर बागकाम करताना त्या महिलेला मध्यभागी फुटलेल्या गाजरच्या भोवती अंगठी सापडली. तिच्या मते १९९५ मध्ये कंपोस्ट खत तयार करताना त्यात पडली असावी.
- चमकदार सूर्यप्रकाशामुळे आपल्या डोळ्यांना इजा होऊ नये म्हणून आणि फॅशन साठी देखील आपण चष्मा (सनग्लासेस) वापरतो. पण सनग्लासेस बनवण्या मागचा हेतू हा नव्हता. ते मूलतः (17व्या शतकात) कोर्टात चिनी न्यायाधीशांना त्यांच्या चेहर्यावरील भावना लपवण्या साठी तयार केले गेले होते.
- आपण आकाशात उंच गगन भरारी घेताना खूप सारे पक्षी पाहतो आणि तसचं आकाशात उडण्याची इच्छा देखील झाली असेल पण कधी विचार केलाय का आकाशात सर्वात उंच उडणारा पक्षी कोणता असेल आणि तो किती उंच उडत असेल? आकाशात सर्वात उंच उडणारा कोणता पक्षी नसून तो एक कीटक आहे, ज्याला आपण भुंगा म्हणून ओळखतो. भुंगा हा आकाशात सुमारे २९,५२५ फूट उंच उडतो. म्हणजेच ९००० मीटर; म्हणजेच जगातील सर्वात उंच पर्वत माउंट एव्हरेस्ट (८८४९ मीटर) पेक्षा देखील उंच. हि माहिती मिळवण्यासाठी वैज्ञानिकांनी २ भुंग्यांवर ट्रॅकर बसवला होता. आणि ते दोन्ही भुंगे ९००० मीटर पर्यंत उंच उडाले होते. आणि हे पाहून वैज्ञानिक देखील अचंबित झाले होते.
- जर तुम्हाला अंतराळवीर व्हायचे असेल तर तुम्हाला रशियन भाषा येणे अनिवार्य आहे. कारण, २०११ मध्ये नासाच्या अंतराळ शटल प्रोग्रामच्या समाप्तीनंतर, रशियाचे सोयुझ अंतराळ यान आयएसएसकडे (ISS - इंटरनॅशनल स्पेस स्टेशन) जाण्याचा एकमेव मार्ग आहे, आणि त्याची सर्व नियंत्रणे रशियन भाषेत असल्याने प्रत्येक अंतराळवीरांनी भाषा शिकावी लागते. काही अंतराळवीरांनी असा दावा केला आहे की ही नवीन भाषा शिकणे हे त्यांच्या प्रशिक्षणातील सर्वात मोठे आव्हान होते. यू.एस. स्टेट डिपार्टमेंट फॉरेन सर्व्हिस इन्स्टिट्यूटच्या म्हणण्यानुसार, इंग्रजी भाषिक अंतराळवीर रशियन भाषा उत्तमरीत्या बोलण्यासाठी 1,100 वर्ग तास मेहनत घ्यावी लागू शकते आणि हा कालावधी फ्रेंच, स्पॅनिश आणि डच सारख्या इतर भाषा शिकण्यासाठी लागणार्या तासांपेक्षा दुप्पट आहे.
- १९०८ मध्ये लंडन मध्ये होणाऱ्या ऑलम्पिक स्पर्धेत रशिया देश एक-दोन तास नवे तर तब्बल १२ दिवस उशिरा पोहचला होता. कारण जेव्हा जग बोल्शेव्हिक कॅलेंडर वापरात होते तेव्हा ते ज्युलियन कॅलेंडर वापरत होते. पण त्यांनतरहि रशियाने बोल्शेव्हिक कॅलेंडर चा वापर करण्यास १० वर्षांचा अवधी लावला. आणि मजेची गोष्ट म्हणजे जिथून ऑलम्पिक ची सुरुवात झाली म्हणजेच ग्रीस देश; हा बोल्शेव्हिक कॅलेंडर वापरन्यास सुरु करणारा सर्वात शेवटचा देश होता. ग्रीस ने १९२३ मध्ये बोल्शेव्हिक चा वापर सुरु केला.
Comments
Post a Comment