DSK - शुण्यपासून शुन्याकडे प्रवास
स्वकर्तुत्वाने ती व्यक्ती प्रसिद्ध झाली खरी पण रातोरात त्यांचं वैभव ,प्रतिष्ठा याला उतरत्या कळा लागल्या . मी कॉलेज मध्ये असताना टोयोटा वाहनावर " DSK " हि अक्षरं दिसायची मनात विचार यायचा अक्षरांचा अर्थ काय असावा . मित्रांनाही याविषयी काही माहित नव्हतं .मी जिथे कंप्युटर शिकण्यासाठी जात होतो तिथले शिक्षक कधी कधी कधी मोटिवेशनल स्टोरी सांगत असत .तेव्हा मला " दीपक सखाराम कुलकर्णी " उर्फ "DSK " हे नाव कळालं मग या व्यक्ती विषयी अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न सुरु झाला . त्यांची यु टूब वरील भाषणं ऐकून मी त्यांना आदर्श मानायला लागलो .
प्रवास शून्यातून विश्व् निर्मितीकडे -
डी. एस. कुलकर्णी आपल्या यशाचं श्रेय आई आणि पत्नी हेमंती यांना देतात. आईने कष्टांचा वारसा दिला आणि हेमंती यांनी १८ पैकी १६ व्यवसायांची जबाबदारी घेऊन त्यांना निश्चिंत केलं. त्यांना समस्त स्त्रीशक्तीबद्दलच प्रचंड आदर वाटतो. तर हेमंतीताईंना डीएसकेंच्या प्रत्येक गुणाचं कौतुक. पुण्यापासून अमेरिकेपर्यंत अडीच लाख मंडळींचं विशाल कुटुंब सक्षमपणे व सहृदयतेने जपणाऱ्या या पतीपत्नीची ही यशोगाथा.
दीपक सखाराम कुलकर्णी ऊर्फ डीएसके यांनी दृढनिश्चय व आत्मविश्वासाच्या बळावर केलेला कसबा पेठ, पुणे ते न्यूजर्सीपर्यंतचा प्रवास पाहाताना "निश्चयाचे बळ, तुका म्हणे तेचि फळ। " या अभंगाची सत्यता पटते. ‘घराला घरपण देणारी माणसं’ ‘अफाट जिद्दीची अचाट कष्टाची शून्यातून विश्वनिर्मिती’ हे शब्दप्रयोग आज डीएसकेची ओळख बनले. चण्याफुटाण्याची गाडी चालवत, कैऱ्या, बोरे, गजरे विकत, पेपरची लाइन टाकत, टेलिफोन पुसत अपार परिश्रमांनी १६०० कोटी रुपयांचं साम्राज्य उभारणारे डीएसके आपल्या यशाचं श्रेय आई आणि पत्नीला देतात. म्हणाले, ‘‘आईने मला कष्टांचा वारसा दिला आणि पत्नीने, हेमंतीने आमच्या १८ पैकी १६ व्यवसायांची जबाबदारी घेऊन मला निश्चिंत केलं. त्याचबरोबर संपूर्ण डीएसके ग्रुपची आर्थिक बाजूही (फायनान्स) तिने समर्थपणे पेलली आहे..’’ पुण्यापासून अमेरिकेपर्यंतचे चार हजार कर्मचारी, ठेवीदार, भागधारक, कर्जरोखेधारक व फ्लॅटधारक अशा अडीच लाख मंडळींचं विशाल कुटुंब सक्षमपणे व सहृदयतेने जपणाऱ्या डीएसके पतीपत्नीची ही यशोगाथा.
आपल्या अनेक उद्योगांपैकी पुणे- सोलापूर रस्त्यावरील ‘डीएसके सुपर इन्फोकॉम इंटरनॅशनल कॅम्पस’ या आंतरराष्ट्रीय शिक्षण संस्थेविषयी दोघांनाही विशेष जिव्हाळा आहे. २० एकरांच्या भव्य परिसरात दिमाखात उभी असलेली ही देखणी वास्तू . फ्रान्समधील एका गुणवत्तापूर्ण शिक्षणसंस्थेच्या सहयोगाने इथे अॅनिमेशन, प्रॉडक्ट डिझाईन व व्हिडीओ गेम मेकिंग यांचं अत्यंत प्रगत शिक्षण इथे दिलं जातं.
‘नायके’च्या बुटांपासून ‘फेरारी’च्या कारपर्यंत डिझाइनच्या अगणित संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणाऱ्या या महाविद्यालयाच्या उभारणीत हेमंतीताईंचा सिंहाचा वाटा आहे. म्हणाल्या, ‘‘एक तीळ सात जणांनी वाटून खावा किंवा अंथरुण पाहून पाय पसरावे, अशा म्हणी डीएसकेंना व मलाही मान्य नाहीत. मुलांनी आकाशात भरारी मारण्याची स्वप्नं बघायला हवीत. सध्याच्या शिक्षणपद्धतीत विद्यार्थी घडत नाहीत, फक्त पुस्तक-पंडित तयार होतात. ही परिस्थिती बदलून किमान शंभर ‘डीएसके’ तयार व्हावेत या सरांच्या ध्यासापोटी इतर व्यवसायातून मिळवलेले २५० कोटी रुपये आम्ही इथे पणाला लावलेत. आता ७/८ वर्षांनंतर त्याची फळं दिसायला लागलीयेत. इथून बाहेर पडणारे अनेक विद्यार्थी आज जगभरात मोठय़ा हुद्दय़ांवर काम करत आहेत. हीच आमची खरी कमाई..’’
‘डीएसके एंटरटेन्मेंट’ने २०१३ मध्ये हेमंतीताईंच्या मार्गदर्शनाखाली ‘सब्रीना’ नावाचा अॅनिमेशनपट केला. त्याला जागतिक कीर्तीचा अॅमी अवॉर्ड मिळालाय. ही अॅनिमेटेड मालिका प्रथम अमेरिकेतील हब टेलिव्हिजनवर प्रसारित झाली तेव्हा तिचा टी.आर.पी. पहिल्या पाचांत होता.
‘ड्रिमसिटी प्रोजेक्ट’ या डीएसकेंच्या ३० हजार कोटी रुपयांच्या नव्या प्रकल्पही एकदम भव्यदिव्य. नदीने जोडण्यात येणाऱ्या ३०० एकरांच्या या इकोफ्रेंडली शहरात जगातील सर्वोत्तम सेवा मिळेल, असा त्यांचा दावा आहे. हाँगकाँगची ट्राम, कॅनडाच्या बोटी, लंडनच्या सायकली, दुबईसारखं उंचच उंच कारंजं, बागा, क्रिकेट, फुटबॉल, टेनिस यांसारख्या ३६ खेळांसाठी ऑलिम्पिक दर्जाच्या सुविधा.. आणि बरंच काही. या प्रकल्पाबाबत हेमंतीताईंच्या चेहऱ्यावर न बोलता उठलेली प्रतिक्रिया.. ‘या माणसाने शिवधनुष्यच उचलायचं ठरवलं
‘डीएसके विश्व’ या पुण्यापासून दूर एका डोंगरावर उभ्या राहिलेल्या गृहप्रकल्पाच्या विक्री मोहिमेत विशिष्ट दिवसात बुकिंग करणाऱ्यांसाठी भेटवस्तूंची योजना जाहीर केली होती. त्यात वॉशिंग मशिनपासून कार पर्यंत अनेक भेटवस्तू होत्या. ही बक्षिसे खरोखर मिळणार की नाही असा संभ्रम ग्राहकांमध्ये राहू नये यासाठी डीएसकेंनी एकूण बक्षिसांच्या रकमेएवढा म्हणजे अडीच कोटी रुपयांचा चेक ग्राहकपेठेकडे आधीच सुपूर्द केला होता. बक्षीस न मिळाल्याची तक्रार आल्यास त्यास ते परस्पर ते देण्याचे अधिकार ग्राहक पेठेस दिले होते. बक्षीस वाटून झाल्यावर पेठेने तीन र्वष वाट पाहिली; परंतु एकही तक्रार न आल्याने ग्राहकपेठेने डीएसकेंचा सत्कार करून ती रक्कम परत केली. या वेळी ग्राहकपेठेचे प्रमुख बिंदुमाधव जोशी यांचे शब्द होते.. ‘ग्राहकांच्या विश्वासासाठी अडीच कोटींचा चेक देणारे डीएसके पहिले.’
‘डीएसके’मधील चिकाटीचं आणि माणसांना जोडण्याचं कसब सांगताना हेमंतीताईंनी त्यांच्या मुंबईतील कफ परेड भागातील ‘दुर्गामाता’ प्रकल्पाचा दाखला दिला. ही आलिशान वास्तू उभारताना, त्यांना जागा ताब्यात घेण्यासाठी अधिक श्रम करावे लगले. १२ र्वष सातत्याने प्रेमपूर्वक पाठपुरावा करून त्यांनी ही जागा मिळवली. उजव्या हाताला धीरुभाई अंबानींची आलिशान इमारत, हेलिपॅड,गेटवेसकट अख्खी मुंबई अशा ठिकाणी उभारलेल्या या ३२ मजली वैभवशाली ‘दुर्गामाता टॉवर्स’ प्रकल्पाला ‘सी.एन.बी.सी. आवाज’चं भारतातील सवरेत्कृष्ट प्रकल्प अॅवॉर्ड मिळालंय. या टॉवरच्या उद्घाटनाला नेहमीच्या प्रथेप्रमाणे फ्लॅटधारकांचे सत्कार तर झालेच पण त्याबरोबर ज्यांनी आपल्या जागा दिल्या त्यांनाही बोलावून त्यांचेही शुभाशीर्वाद घेण्यात आले. सरांचं म्हणणं..‘सद्भावना जपणं सर्वात महत्त्वाचं..’ डीएसकेंच्या व्यक्तिमत्त्वावर प्रकाश टाकणारे असे असंख्य अनुभव प्राचार्य शाम भुर्के यांच्या ‘शून्यातून विश्व निर्माण करणारे डीएसके’ या पुस्तकात वाचायला मिळतात.
जे करेन ते सर्वोत्कृष्ठ ..’ हा संपूर्ण डीएसके कुटुंबाचाच ध्यास असल्याचे जगप्रसिद्ध टोयोटा कंपनीने विक्री, ग्राहक समाधान व उत्कृष्ट प्रतीची सेवा या तिन्ही मापदंडांवर आजवर दिलेल्या २० अवॉर्ड्सपैकी १४ ‘डीएसके टोयोटा’ने पटकावलीयत.भारत सरकारच्या जनधन योजनेतून जी ३० कोटी बँक खाती उघडायची आहेत त्यातील ३ कोटी खाती डीएसके डिजिटलने मध्य प्रदेशात उघडली आहेत. त्यायोगे ३००० हातांना काम मिळालंय. शेतकऱ्यांना दुग्धव्यवसायात मदत करणार उपकरण मिल्कोट्रॉनिक काढलं. हा रोबो दुधातील भेसळ शोधतो त्यामुळे शेतक ऱ्यांना योग्य मालाचे त्वरित पैसे मिळतात. डीएसके गप्पा, पुणे आकाशवाणीवरील ‘प्रश्न तुमचा उत्तर डीएसकें’चे हा कार्यक्रम, ठेवीदार, भागधारक व फ्लॅटधारक यांच्यासाठी आयोजित केले जाणारे सांगीतिक कार्यक्रम अशा अनेक सांस्कृतिक धाग्यांतून दोघंही सर्वसामान्यांशी जोडून राहत.
डीएसकेंना पत्नीच्या कर्तृत्वाविषयीच नव्हे तर समस्त स्त्रीशक्तीबद्दलच प्रचंड आदर वाटतो. ते म्हणतात, देवादिकांनीही स्त्रियांची योग्यता जाणलीय. म्हणूनच तर लक्ष्मीकडे अर्थखात्याची जबाबदारी आहे. तर सरस्वतीवर शिक्षणाची धुरा, संरक्षणाची मदारही दुर्गामातेवर आहे. हा आदर्श ठेवून आपणही स्त्रीचा गौरव करायला शिकलं पाहिजे..
असे बरेच किस्से मी वाचले होते ऐकले होते .म्हणून मी त्यांना आदर्श मानलं २०१८ फेब्रुवारी मध्ये बातमी आली कि " बांधकाम व्यावसायिक डी यस कुलकर्णी याना अखेर अटक " या बातमीची अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला तर मिळालेली माहिती थोडक्यात लिहीत आहे .
प्रवास विश्वनिर्मितीकडून शुन्याकडे -
ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांना दिल्लीतून अटक करण्यात आली. पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून ही कारवाई करण्यात आली.डी. एस. कुलकर्णी यांनी ठेवीदारांची रक्कम परत करण्यासाठी वेळोवेळी उच्च न्यायालयाकडून मुदत घेतली होती.एकवेळ भीक मागावी पण डीएसकेंनी लोकांचे पैसे उभे करावेत असे म्हणत याआधीच कोर्टाने डीएसकेंना फटकारले होते. तसेच लोकांचे पैसे बुडवून डीएसके सुखाने झोपतात असे म्हणतही कोर्टाने डीएसकेंना झापले होते. कोणत्याही प्रकारचा विश्वास उरला नाही असे कोर्टाने म्हणत कारवाईसाठी तयार राहण्याचा इशाराच दिला होता. त्यानुसार त्यांच्यावर कारवाई करण्यात आली .काहीही झाले तरीही लोकांचे पैसे बुडवणार नाही, क्राऊड फंडिंगच्या माध्यमातून पैसे उभे करेन अशी आश्वासने डी एस कुलकर्णी यांनी वारंवार दिली. मात्र ते कोर्टात पैसे भरण्यात अपयशी ठरले. तसेच त्यांनी दिलेली आश्वासनेही त्यांना पाळता आली नाही.
अश्या प्रकारे शून्यातून DSK यांचा प्रवास पुन्हा शुन्याकडे येऊन थांबला.
Comments
Post a Comment