बिटकॉइन चे फायदे आणि तोटे.

बिटकॉईन फायदे आणि तोटे -

💁‍♂️ ‘सा तोशी नाकामोटो’ या नावाखाली कोणा व्यक्ती किंवा गटाने बिटकॉईनचे तंत्रज्ञान २००८ मध्ये आणले. ‘सातोशी नाकामोटो’ची ओळख अद्याप समजली नाही.

*नेमके काय आहे बिटकॉईन ?*

क्रिप्टो करन्सीचे एक रूप म्हणजे ‘बिटकॉईन’ होय. बिटकॉईन हे आभासी चलन असून, ते ऑनलाइन उपलब्ध असते. बॅंका किंवा सरकार हे चलन छापत नाही. मायनिंग या अत्यंत क्‍लिष्ट प्रक्रियेतून बिटकॉईन बनवली जातात.

🙆‍♂️ *क्रिप्टो करन्सी म्हणजे काय ?*

▪️क्रिप्टो करन्सी म्हणजे चलनी नोटांना पर्याय असणारी एक डिजीटल वा व्हर्च्युअल करन्सी.

▪️बिटकॉईन, लाईटकॉईन, रिपल, इथेरियम आणि झेड कॅश नावाच्या काही क्रिप्टोकरन्सीज प्रसिद्ध आहेत.

▪️यातली बिटकॉईन क्रिप्टोकरन्सी साधारण दशकभरापूर्वी लाँच करण्यात आली होती.

▪️जशी जगभरात रुपया, डॉलर,युरो, पाऊंड अशी विविधं चलने आहेत, तशाच जगभरात वेगवेगळ्या क्रिप्टो करन्सीजही आहेत.

⏳ *बिटकॉईन कार्यान्वित कसे होते ?*

🔸 जशा आपल्याला बँकांमधून नोटा मिळतात तसंच इथंही ऑनलाईन साईट्सवर हे चलन तुम्हाला तुमच्याकडच्या पैशातून खरेदी करता येते.

🔸 ही खरेदी केल्यावर तुमचे एक वॉलेट तयार होते, ज्यात ही करन्सी तुम्ही साठवू शकता. अशी प्रत्येक खरेदी केल्यावर एक नवा ब्लॉक तयार होतो. आणि या प्रक्रियेला माईनिंग म्हणतात.

🔸 जितके जास्त आर्थिक व्यवहार एका ब्लॉकचेनमध्ये होतील, तितके अधिक ब्लॉक बनतील आणि तितकी अधिक माईनिंग होईल.

🔸 बिटकॉईनचे व्यवहार ऑनलाईन चालतात. आणि हे व्यवहार एका ब्लॉकचेन नेटवर्कवर असलेल्या फक्त दोन व्यक्तींमध्ये होतात. आणि त्यावर इतर कुणाचेही नियंत्रण नसते.

🔸 हे सगळे व्यवहार ऑनलाईन आणि त्याचबरोबर फक्त दोन अकाऊंट दरम्यान होतात. कुठलाही मध्यस्थ नसतो.

भारतात बिटकॉईनला मान्यता आहे का ?*

व्हर्च्युअल करन्सीच्या माध्यमातून क्रिप्टोकरन्सीमध्ये व्यवहार करायला सुप्रीम कोर्टाने मार्च 2020 मध्ये परवानगी दिली आहे. परंतु अर्थमंत्री सीता रामन यांनी अलीकडेच भारतात व्हर्च्युअल चलनावर बंदी घालण्याची सूचना दिली आहे. पण यात बिटकॉईनचा स्पष्ट उल्लेख अद्यापतरी केलेला नाही.

✔️ *बिटकॉईनचे फायदे काय ?*

🟢 बिटकॉईनचे व्यवहार कमीत कमी वेळात आणि वर्षाचे 365 दिवस, 24 तास आपण करू शकतो. बँकांच्या सुट्टया, नोकरशाही यांचा परिणाम या व्यवहारांवर होत नाही.

🟢 यासाठी डेबिट, क्रेडिट किंवा कुठलेही कार्ड लागत नाही. केवळ पहिल्यांदाच वॉलेट बनवायला एक ऑनलाईन व्यवहार करावा लागतो.

🟢 तुमची माहिती अतिशय गुप्त राखली जाते. किंबहुना ही माहिती आणि तुमचे बिटकॉईन पैसे एन्क्रिप्टेड स्वरुपात अर्थात काँप्यूटर कोडेड असतात. ते बिटकॉईन यंत्रणा चालवणाऱ्यांनाही माहीत नसतात.

🟢 एका 27 ते 34 कॅरेक्टर्सच्या ॲड्रेस मार्फत बिटकॉईनचे व्यवहार होतात. या पत्त्याची कुठेही नोंद नसते. त्यामुळे व्यवहार गुप्त राहतो.

❌ *बिटकॉईनचे तोटे काय ?*

🟢 बिटकॉईन हे सर्वसामान्य चलन नाही. म्हणजे तुम्हाला तुमचा टॅक्स किंवा इतर गोष्टींसाठीचे मूल्य क्रिप्टोकरन्सीने भरता येणार नाही.

🟢 शिवाय या व्यवहारांवर कोणत्याही नियामकाचे वा सरकारचे नियंत्रण वा लक्ष नसते. या व्यवहारांसाठी काही नियम नाहीत. म्हणूनच याचा गैरवापर होण्याची शक्यता जास्त असते.

🟢पण जमेची बाजू म्हणजे डिजीटल करन्सी असल्याने फसवले जाण्याची शक्यता उरत नाही.

💸 *बिटकॉईनचे आजचे बाजारमूल्य किती ?*

मार्च 2020 मध्ये एका बिटकॉईनचे मूल्य 5 हजार डॉलर होते. आजअखेर ते 60 हजार डॉलरच्या वर गेले आहे. याचाच अर्थ आता एका बिटकॉईनचे मूल्य शनिवारी (13 मार्च 2021) 60,322 डॉलर आणि भारतीय चलनात जवळपास 44 लाख रुपयांवर पोहोचले आहे.

🤨 *हेही जाणून घ्या*

🔈 अ‍ॅलन मस्क यांच्या 'टेस्ला' कंपनीने बिटकॉईनमध्ये 11 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.

🔈 'टेस्ला'कडून आगामी काळात देयक म्हणून बिटकॉईनचाही स्वीकार केला जाऊ शकतो.

🌎 जगभरात साधारण 1 ते 2 कोटी लोक हे बिटकॉईन वापरत असल्याचा अंदाज केंब्रिज विद्यापीठाच्या जज बिझनेस स्कूलचे प्राध्यापक डॉ. गॅरिक हॅलिमन यांनी व्यक्त केला आहे.

Comments

Popular posts from this blog

कोळंबी च्या रेसिपी

मुंबई मधील मराठी माणूस