आठवणींचा सुवर्णकाळ -मालगुडी डेस
२०१८ साली मला मालगुडी डेज या टीव्ही सिरीज बद्दल माहिती मिळाली आणि मी युट्यूब वर लगेच बघायला सुरुवात केली आणि वास्तवदर्शी, मास्टरपीस कलाकृती नेमकं कशाला म्हणतात याची जाणीव मला झाली.प्रत्येक कलाकारांचा सहज आणि सुंदर व खरा अभिनय,शुटिंग ची लोकेशन बघून मला असे वाटलंच नाही की मी एखादी सिरीज बघतोय.एवढ्या उशिरा मला या मास्टरपीस बद्दल माहिती मिळाली आणि मी इतक्या उशिरा ही सिरीज बघतोय याचं मला एकंदरीत दुःख झाला.आज सिनेमा इंडस्ट्री जरी तंत्रज्ञानात सर्वोच्च स्तरावर पोहोचली असेल पण तरीही मालगुडी डेज सारखी उमदा आणि लाजवाब टीव्ही सिरीज पुन्हा बनवू शकणार नाही एवढी मात्र खात्री आहे.
प्रसिद्ध आर.के.नारायण यांच्या मालगुडी डेज् या लघुकथासंग्रहावर आधारित व प्रसिद्ध कन्नड अभिनेता व दिग्दर्शक शंकर नाग दिगदर्शीत "मालगुडी डेज "ही टीव्ही मालिका दूरदर्शनवर १९८६ साली प्रदर्शित झाली होती.एकूण ५४ भाग असलेल्या या मालिकेची शुटिंग कर्नाटकातील शिमोगा जिल्ह्यातील "अगुंबे" या गावात केली गेली होती.
या मालिकेत संगीत निर्देशनाची धुरा प्रसिद्ध वायलिन वादक एल.वैद्यनाथन सरांनी सांभाळली होती.त्यांच्या आवाजातील "तानाना ताना नानाना "ही धून अजरामर झाली आहे जी आठवून आजही अंगावर शहारा येतो.इंग्रजी व हिंदी भाषेतील या मालिकेला नंतर अनेक वेगवेगळ्या भाषेत डब केल्या गेले.गिरीश कर्नाड,अनंत नाग,देवेन भोजानी,हरीश पटेल,दीना पाठक,मास्टर मंजुनाथ इत्यादी कलाकारांनी जीव तोडून अभिनय केला आणि मालगुडी डेज या मालिकेला वास्तवदर्शी व अफलातून बनवलं तर सुरुवातीला येणाऱ्या आर.के.लक्ष्मण यांच्या कार्टून्सनी त्यामध्ये सुंदर भरून त्याला यादगार बनवले.
८०-९० च्या काळात जन्मलेल्या पिढ्यांनी "मालगुडी सिरीज बघितली नसेल असे होऊ शकत नाही आजही त्याबद्दल विचार करून ही पिढी भूतकाळात रमून जाते एवढी या मालिकेची ताकद आहे.भारतीय टेलिव्हिजनच्या इतिहासात "मालगुडी डेज "ही मालिका अजरामर ठरलेली आहे आणि नेहमी अजरामर राहणार यात काही संशय नाही.R.K नारायण यांच्या कथेतील नायकाप्रमाणेच मालगुडी डेज मालिकेतील नायक सुद्धा हा नेहमी सामान्य माणूसच असायचा.
उदा :- हमाल,पोस्टमन,रिक्षावाला,मिठाईवाला,कारकून,विद्यार्थी, चोर,रखवालदार, किराणा दुकानदार इत्यादींना मुख्य केंद्रस्थानी ठेवून त्यांचा जीवनसंघर्ष व त्यांच्या जीवनातील घटनाक्रम आपल्याला ५४ भागात दाखवला गेला आहे.
मालगुडी हे ब्रिटिशकाळातील दक्षिण भारतातील एक छोटंस गाव जे आर.के नारायण यांनी त्यांच्या कल्पनेतून बनवलं होत.या गावात एका ब्रिटिश अधिकाऱ्याचा पुतळा,पोस्ट ऑफिस,शाळा वगैरे इमारती होत्या.मालगुडी डेज यातील मुख्य नायक हे याच गावातील रहिवासी असतात जे जीवनासाठी संघर्ष/धडपड करताना आपल्याला दाखवले गेलेले आहेत.या पात्रांचा संघर्ष/जीवन बघून आपला आपल्या आयुष्य/जीवनाकडे बघण्याचं दृष्टिकोन बदलतो,खूप काही नवीन शिकायला मिळते,प्रेरणा/ऊर्जा मिळते..स्वामी अँड फ्रेंड्स या भागापासून तर मंदिर का बुढा पर्यत प्रत्येक भाग जबरदस्त आणि मनोरंजक आहे.
नक्कीच बघा आणि इतरांना सुद्धा सुचवा विशेष करून लहान मुलांना दाखवा !!
Comments
Post a Comment