आरुषी हत्याकांड -दिल्ली

खरेतर आरूषी व हेमराज यांचे 2008 साली झालेले हत्याकांड कोणी केले आणी हे हत्याकांड करण्यामागचा हेतु काय होता? हे आजतागायत गुढ रहस्य आहे.

सीबीआय सुद्धा या हत्याकांडाची उकल पुराव्यासह करू शकलेली नाही. हे तपासयंत्रणांचे अपयश म्हणायचे की, आरोपींनी नियोजनबद्ध हत्याकांड घडवून तेथील सर्व पुरावे नष्ट केले असे म्हणायचे, तेच समजत नाही.

आरूषी व हेमराज हत्याकांडाचा गुन्हेगारांच्या मानसशास्त्रीय पद्धतीने घेतलेला आढावा-

गुन्हेगारांचे मानसशास्त्र असे सांगते की, कोणताही गुन्हेगार जेव्हा एखादी हत्या करतो, तेव्हा त्यामागे काही ना काही हेतु असतो. प्रत्येक हत्येमागे एखादे तरी कारण असतेच.

पैसा मिळवण्यासाठी हत्या केली जाते.

मालमत्ते संदर्भात हत्या केली जाते.

सुड घेण्यासाठी हत्या केली जाते.

अनैतिक शारीरिक संबंधामुळे हत्या केली जाते.

जगात कोठेही जेवढ्या हत्या होतात, त्यामागे वरील कारणांचे प्रमाण जवळपास 90% असते.

हत्या झाल्याचे पोलीसांना समजताच पोलीस घटनास्थळी येतात. तेथे लगेचच तपास सुरू करतात. घटनास्थळावरील पुरावे गोळा करतात. तेथील फोटो काढून घेतात. व्हिडिओ काढतात. घटनास्थळाच्या आसपास शोध घेऊन जेवढे पुरावे गोळा करता येतील तेवढे करतात. यामध्ये सर्वात महत्वपूर्ण म्हणजे तेथील वस्तूंवरील फिंगरप्रिटस (बोटांचे ठसे), संशयास्पद वस्तु, ज्या हत्याराने हत्या केली गेली ते हत्यार.

हत्या झालेल्या व्यक्तीचा मेडिकल रिपोर्ट सुद्धा खुप काही सांगत असतो. हत्या किती वाजता झाली? कशी केली गेली? येवढेच नव्हे तर हत्या झालेली व्यक्ती स्त्री असेल तर तीच्यावर बलात्कार ,शारीरिक जबरदस्ती झाली होती काय? येवढेच नाही तर सहमतीने शारीरिक संबंध चालु असतानाच जर हत्या झाली तर ते सुद्धा मेडिकल रिपोर्ट मधुन समजु शकते.

2008 मध्ये हत्या झालेली आरूषी दिदी ही फक्त 14 वर्षांची होती. तर हेमराज हा तीच्या घरातील नोकर असुन त्याचे वय 42 वर्ष इतके होते.

16 मे 2008 उत्तर प्रदेश मधील नोएडा. सेक्टर 25 .जलवायु विहार बिल्डिंग.

हत्या झाली त्या रात्री घरात चार माणसे होती. आरूषीचे आई वडील डाॅक्टर राजेश तलवार, डाॅक्टर नुपुर तलवार, आरूषी तलवार.

सर्वप्रथम आरूषीची हत्या झाल्याचे प्रथमदर्शनीच पोलीसांना दिसुन आले होते. त्यांच्या घरातील नोकर हेमराज गायब होता. आरूषीचे वडील डाॅक्टर राजेश तलवार यांनी आरूषीच्या हत्येचा संशयित म्हणून हेमराजचे नाव घेतले होते.

पण पोलीसांनी केलेल्या तपासात दुसऱ्या दिवशी हेमराजचा मृतदेह घराच्या छतावर सापडला होता.

वारंवार चौकशी केल्यानंतर पोलीसांनी ही ऑनर किलींगची केस आहे असे समजुन डाॅक्टर राजेश तलवार यांना अटक केली होती.

सीबीआयने केलेल्या दाव्यानुसार, 16 मे 2008 च्या रात्री डाॅक्टर तलवार दांपत्याने स्वतःच्याच घरी आपली मुलगी आरूषी आणी नोकर हेमराज यांचा खून केला आणी पुरावे नष्ट केले.

सीबीआयने यासंबंधी डाॅक्टर राजेश तलवार यांची नार्को टेस्ट केली. आणी नंतर त्यांना आरोपी केले होते.

सीबीआयचे असे म्हणणे होते की, 16 मेच्या मध्यरात्री डाॅक्टर तलवार यांना आपली मुलगी आरूषी व नोकर हेमराज हे दोघे आपत्तीजनक अवस्थेत सापडले होते. तेव्हा त्यांचा राग अनावर झाला आणी त्यांनी गोल्फ स्टीक घेऊन त्या दोघांवर वार केले. यामध्ये आरूषी जागीच मृत झाली तर हेमराज हा बेशुद्ध पडला. यानंतर हेमराजला घराच्या टेरेसवर नेऊन तेथेच त्याचा खुप केला. नंतर सर्व पुरावे नष्ट केले. पुरावे नष्ट करण्यामध्ये डाॅक्टर नुपुर यांनी सुद्धा मदत केली होती.

यानंतर गाझियाबाद विशेष न्यायालय, अलाहाबाद हायकोर्ट, सुप्रिम कोर्ट असा हा खटला फिरत राहीला होता.

यादरम्यान कोर्टातील जबाब व पुरावे यामध्ये बरेच बदल झाले.

खरेतर डाॅक्टर राजेश तलवार यांच्या रक्ताने माखलेल्या हाताचे ठसे टेरेसवर सापडलेले होते.

आरूषीच्या मानेवर एकदम तज्ञ ऑपरेशन करणाऱ्या सर्जन ने कराव्या तशा ऑपरेशनच्या हत्याराने केलेल्या खुणा सापडल्या होत्या.

आरूषीची आई डाॅक्टर नुपुर यांच्या परदेशात रहाणाऱ्या बहीणीने डाॅक्टर नुपुर यांच्या विरोधात मांडलेले म्हणणे.

दुसऱ्या डाॅक्टर सोबत असलेले विवाहबाह्य संबंध.

अशा अनेक गोष्टी डाॅक्टर तलवार दांपत्याला या दुहेरी हत्याकांडातील आरोपी ठरवत होत्या.

गुन्हेगारांच्या मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून या हत्याकांडाचा विचार केला तर

हे हत्याकांड पैशासाठी झालेले नाही. तसेच सुड घेण्यासाठी किंवा मालमत्तेसाठी सुद्धा झालेले नाही. असे दिसून येते. या हत्याकांडामागे फक्त अनैतिक शारीरिक संबंध येवढेच कारण दिसून येते.

हे हत्याकांड पैशासाठी झाले असते तर घरात चोरी झाली असती. मालमत्तेसाठी होण्याचेही कोणतेच कारण दिसून आलेले नाही आणी सुडाचा पण विषय दिसून येत नाही.

समजा आपण असे समजले की, हे हत्याकांड बाहेरील कोणीतरी केलेले आहे. पण घरातील दार आतुन बंद असताना डाॅक्टर तलवार दांपत्याला काहीच आवाज न येता, आरूषी व हेमराज यांनी खुन होताना काहीच आरडाओरड केली नसताना, जेणेकरून डाॅक्टर तलवार दांपत्य जागे झाले असते. असे काहीही न होता कोणी व्यक्ती बाहेरून येऊन आरूषीचा व हेमराजचा खुन करतो. आणी डाॅक्टर तलवार दांपत्याला सोडून देतो व निघुन जातो.

हे तुम्हाला तरी खरे वाटते काय?

जरी बाहेरील व्यक्तीने खुन केला असला तरीही त्याने फक्त आरूषी व हेमराज यांनाच का मारले? डाॅक्टर तलवार दांपत्याला का मारले नाही?

बाहेरून कोणीतरी घरात येऊन खुन करते. खुन होताना आरूषी व हेमराज यांनी काहीच प्रतिकार केला नसेल काय? तसेच त्यांनी मोठ्याने आरडाओरड केली नसेल काय? 42 वर्षाचा हेमराज येवढा पण किरकोळ नव्हता की, बाहेरून कोणी येऊन त्याला सहजासहजी मारेल, तेव्हा तो काहीच प्रतिकार करणार नाही. मग अशा वेळेस झालेल्या झटापटीचा आवाज मध्यरात्रीच्या वेळेस डाॅक्टर तलवार दांपत्याच्या रूममध्ये गेला नसेल काय?

बाहेरून जेव्हा एखादी व्यक्ती हत्या करण्याच्या उद्देशाने एखाद्या घरात जाते. तेव्हा ती स्वतःचे हत्यार घेऊन येते. पण येथे दोघांचाही खुन घरातच असलेल्या हाॅकी स्टीकने झालेला आहे.

आपण असे समजुया की, डाॅक्टर तलवार यांच्या घरात चोरी करण्याच्या उद्देशाने चोर घरात घुसलेले होते. चोरी करत असताना कदाचित हेमराज ने त्यांना पाहीले असावे. तो प्रतिकार करत असताना त्याचा आवाज ऐकून आरूषी बाहेर आली असावी. त्या वेळेस चोरांनी आरूषी व हेमराज यांचा खून केला. किंवा चोर चोरी करत असताना आरूषीने त्यांना पाहिले. तीने हेमराजला हाक मारली हेमराज उठला. तेव्हा चोरांनी हेमराज व आरूषी या दोघांचाही खुन केला असावा.

पण यामध्ये लक्षात घेण्यासारख्या गोष्टी अशा आहेत की, चोरी करणारे चोर शक्यतो खुन करत नाहीत. खुन जरी अचानक झाला तरीही ते चोरी करूनच जातात आणी शक्यतो बोटांचे ठसे इ पुरावे नष्ट करण्यामध्ये वेळ वाया घालवत नाहीत.

दुसरी गोष्ट म्हणजे मध्यरात्रीची वेळ होती. त्यामुळेच आरूषी तीच्या रूममध्ये झोपली होती तर हेमराज त्याला झोपण्यासाठी दिलेल्या रूममध्ये किंवा दुसरीकडे झोपला होता. मध्यरात्रीच्या वेळेस चोरांना पाहून दोघेही एकदमच उठले असतील, अशी शक्यता तुम्हाला किती प्रमाणात खरी वाटते?

तिसरी गोष्ट म्हणजे, चोरांना पाहून कोणीही चोर चोर असा आरडाओरडा करतोच. ती एक नैसर्गिक प्रतिक्रिया असते. असा आरडाओरडा ऐकून तलवार दांपत्य पण जागे व्हायला हवे होते.

म्हणजेच आरूषी व हेमराज यांच्या हत्याकांडामध्ये चोर, खुनी अशा बाहेरील लोकांचा संबंध नाही. हे तुमच्या लक्षात आले असेल.

याचा अर्थ आरूषी व हेमराज यांच्या हत्याकांडामध्ये घरातील कोणाचा तरी संबंध आहे. पण घरामध्ये तर फक्त तलवार दांपत्य होते. ते आपल्याच एकुलत्या एका मुलीचा खुन का करतील? शेवटी आरूषी वयाने लहान म्हणजे 14 वर्षाची होती. तिच्याकडून एखादी चुक झाली तरीही लहान मुलगी म्हणून तीच्या चुकीवर पांघरूण घालून तीला माफ केले असते.

हे हत्याकांड होण्याअगोदर काहीच दिवसांपुर्वी हेमराजने नेपाळ मध्ये रहाणाऱ्या आपल्या पत्नीला फोन केला होता. तेव्हा हेमराजने पत्नीला असे सांगीतले होते की,

डाॅक्टर तलवार सर अलीकडे माझ्यावर खूप चिडचिड करत आहेत. छोट्या छोट्या गोष्टीवरून चिडचिड करतात.

माझ्या एक गोष्ट लक्षात येत नाही की, डाॅक्टर तलवार हे हेमराज वर काही दिवसांपासून चिडचिड का करत होते?

हेमराज कडुन अशी कोणती गोष्ट चुकली होती की, डाॅक्टर तलवार त्याच्यावर चिडचिड करत होते?

असे तर नाही ना की, हेमराज व आरूषी यांच्यातील अनैतिक संबंधांबद्दल डाॅक्टर तलवार यांना संशय आला होता. म्हणून ते चिडचिड करत होते. आणी त्या दोघांना एकत्र असताना ते पकडणार होते. त्यांनी सर्व नियोजन अगोदरच करून ठेवले होते. त्यांनी हेमराज व आरूषी यांचेवर लक्ष ठेवले होते आणी 16 मेच्या मध्यरात्री हेमराज जेव्हा आरूषीच्या खोलीत गेला, तेव्हा डाॅक्टर तलवार हे गोल्फ स्टीक घेऊन आरूषीच्या खोलीत गेले. तेथे या दोघांना त्यांनी नको त्या अवस्थेत असताना पाहीले. क्षणार्धात त्या दोघांना कोणतीच संधी न देता त्यांनी या दोघांवर गोल्फ स्टीकने वार केले.

पण आरूषीदीदीच्या मेडिकल रिपोर्ट मध्ये शारीरिक संबंध झाल्याचे किंवा बलात्कार झाल्याचे स्पष्ट झालेले नाही. तसे विर्याचे डाग दिसुन आलेले नाहीत.

मग आरूषी दिदीच्या खोलीत रात्री हेमराज गेला होता. आणी त्या दोघांना आपत्तीजनक अवस्थेत डाॅक्टर तलवार यांनी पाहीले. हे कसे काय सिद्ध होऊ शकेल?

तलवार दांपत्याला सुप्रीम कोर्टाने निर्दोष सोडलेले आहे. आरूषीचा मेडिकल रिपोर्ट यासंदर्भात खुप महत्वपूर्ण होता. त्याचबरोबर हेमराज याचाही मेडिकल रिपोर्ट खुप महत्वपूर्ण होता. कारण या मेडिकल रिपोर्ट मधुन शारीरिक संबंध झाले होते काय? जबरदस्ती केली होती काय? याची माहितीही उघड होते. यासंदर्भात या दोघांचाही मेडिकल रिपोर्ट काय म्हणतो?

तसेच टेरेसवर डाॅक्टर तलवार यांचे रक्ताने माखलेले हाताचे ठसे जेथे हेमराजचे प्रेत सापडले होते, त्या टेरेसवर कसे सापडले? आणी आरूषीच्या मानेवर डाॅक्टर ऑपरेशन करताना वापरतात त्या ऑपरेशन थिएटर मधील हत्याराचे घाव कोणी केले? या दोन गोष्टींबद्दल सुप्रीम कोर्टाने काय विचार केला? याबाबत मला माहीत नाही.

तलवार दांपत्याला कोर्टाने निर्दोष सोडले असले तरिही खालील काही प्रश्न या केसबद्दल शेवटपर्यंत रहस्यमय म्हणून रहाणार आहेत.

  1. घरात फक्त चारच माणसे होती. मुख्य दरवाजा आतुन बंद होता. आरूषीचा दरवाजा पण तीने झोपताना आतुन बंद केलेला होता. मग त्या रात्री आरूषी व हेमराज यांचा खून कोणी केला?
  2. ज्या रात्री खून झाला त्या रात्री सर्वजण झोपलेले असतानाही घरातील इंटरनेटचा राऊटर सतत ऑन ऑफ कसा काय होत होता?
  3. जेथे हेमराजचे प्रेत सापडले तेथील म्हणजेच घराच्या टेरेसच्या दाराची एक चावी हेमराज कडे होती तर दुसरी चावी तलवार दांपत्याकडे होती. मग खुन झाल्यानंतर जेव्हा पोलीस घरात शोध घेत होते, तेव्हाच तलवार दांपत्यानी टेरेसची चावी पोलीसांना का दिली नाही? आणी टेरेसची चावी सापडत नव्हती तर मग पोलीसांनी टेरेसचा दरवाजा तोडून तेथे शोध का घेतला नाही?
  4. खुन झाले त्या रात्री घरात कोणीतरी दारू पिलेले होते, कारण घरात दारूच्या रिकाम्या बाटल्या सापडल्या होत्या. ही दारू नक्की कोणी पिली होती?
  5. आरूषी व हेमराज यांचा खून कोणी व कशासाठी केला? याचे उत्तर आजही एक रहस्यच आहे. आणी येथुनपुढे हे रहस्य आता कधीच उलगडणार नाही. हे नक्कीच!

Comments

Popular posts from this blog

कोळंबी च्या रेसिपी

मुंबई मधील मराठी माणूस

बिटकॉइन चे फायदे आणि तोटे.