ऍमेझॉनला असणारे मराठी भाषेचे वावडे

खालील बातमी वाचा.

पण आता या अमितला कोण सांगणार बरे की तुम्ही मराठी दिली नाहीये म्हणून ते हिंदीचा वापर करताय तर.

अमॅझॉन भारतात सर्वात जास्त उत्पन्न महाराष्ट्रातून मिळवते. जवळपास २०% नफा फक्त एकट्या महाराष्ट्रातून येत असेल. मराठी ही भारतातील तिसरी सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा आहे.

असे असताना देखील मराठी भाषेचा इतर भाषांसोबत समावेश करण्यास ते नकार देत आहेत. खाली बघा.

वरील सर्व भाषा बोलणाऱ्या लोकांची जनसंख्या मराठी लोकांपेक्षा कमी आहे. परंतु ते जुमानत नाहीत. मागणी करावी लागते. हट्ट करावा लागतो. काहीवेळेस तर आक्रोश.

अमेझॉनला हवाय फक्त आणि फक्त नफा. मराठी प्लॅटफॉर्म न टाकून त्यांना तो खर्च कमी करायचा आहे. पण मग त्यांनी असे दाक्षिणात्य राज्यांबाबत का नाही केलं? मराठी लोक हिंदीत वापरताय मग वापरू द्या असें त्यांना कदाचित वाटत असेल.

हा सरळसरळ भेदभाव आहे. एकतर तुम्ही सगळ्या भाषांना सारखी वागणूक द्या नाहीतर गुमान फक्त इंग्रजी वापरा. कशाला दाक्षिणात्य राज्यांचे फाजील लाड? आणि जे राज्य भारतातील सर्वात श्रीमंत राज्य आहे त्याला अशी वागणूक मुळीच मिळायला नको. मनसेने आवाज उठवणे गरजेचे होते.

Comments

Popular posts from this blog

कोळंबी च्या रेसिपी

मुंबई मधील मराठी माणूस

बिटकॉइन चे फायदे आणि तोटे.