मुंबई मधील मराठी माणूस

मराठी माणसांना बोलण्या आधी काही रोजगाराकडे लक्ष द्यावे.मुबंई भय्या लोकशिवाय चालू शकत नाही. भय्या लोक हे काय मुबंई नामक गाडीचे इंधन आहेत काय त्यांच्याशिवाय मुंबई चालू शकत नाही.आधी गुजराती /मारवाडी लोकांनी मराठी जनतेच्या डोक्यात भरवले की मराठी माणूस आळशी असतो. मेहनत करत नाही.आता भय्या लोक बोलतात आमच्याशिवाय मुंबई चालू शकत नाही.भय्या लोकशिवाय पुणे /नाशिक /नागपूर /औरंगाबाद चालते ना. दक्षिणे कडील राज्ये सुद्धा त्यांच्याशिवाय चालतातi.आता पाणीपुरी विकायला फक्त मुंबईच लागते का. पाटणा किंवा लखनौ मध्ये पण पाणीपुरी विकू शकतात की.आता बोलू मेहनतीवर. स्वतःच्या मराठी माणसांना आळशी बोलणारी बरीच मराठी माणसे महाराष्ट्रात जीवापाड मेहनत करीत आहेत.जरा आपल्या अवतीभोवती नजर टाकली की तुम्हाला मराठी माणसाची मेहनत पण दिसून येईल.सुरुवात करूया मुंबईला उभे करणाऱ्या गिरणी कामगारांपासून. दिवसाची रात्र करून यांनी मुंबई च्या मिल्स चालवली. मिळाले काय. गिरण्या बंद पडल्या. गुजराती /मारवाडी लोकांना महाराष्ट्रात 1 रुपये मीटर च्या भावाने जमिनी मिळाल्या. त्यावर यांनी मिल्स उभारल्या. आणि म्हणे गुजराती /मारवाडी समाजामुळे मुंबई श्रीमंत बनली.अहो महाराष्ट्र सरकारमुळे हे गुजराती मारवाडी श्रीमंत बनले. जमिनी काढून घेतल्या की भीक मागतील हे. या जमिनी त्यांना 99 वर्षाच्या भाडे तत्वावर दिल्या होत्या. त्यावर हे सर्व गब्बर झाले. त्यांनी जागेला सोन्याचं भाव आलं हे समजताच मिलच्या जमिनी बिल्डर लॉबी च्या घशात घातल्या. आणि पहिला मराठी मेहनती माणूस (गिरणी कामगार ) बेरोजगार झाला आणि हळू हळू हद्दपार झाला.आता वळुयात दुसरीकडे. आपली 24 तास रक्षा करणारे. सद्रक्षणाय खलनिग्रणाय.मुंबई पोलीस किंवा महाराष्ट्र पोलीस.ड्युटी होउर्स किती. सांगता येत नाही. म्हणजे 8–12–16–24 कितीही.पण यांची मेहनत आम्हाला दिसतच नाही.आम्हाला दिसतात ते night ड्युटी करणारे ते परप्रांतीय सुरक्षा रक्षक. सुरक्षा कसली तर CCTV च्या निगराणीत असलेल्या जागांचे रक्षण करायचे तेही CCTV च्या टप्प्याबाहेर राहून.अगदी आरामात.आता पुढे बघा. सकाळी तुमच्या घरी पोहचतो तो पेपरवाला, दूधवाला.पुन्हा मराठी. पण हे तर मेहनती नसतील ना?कारण आम्हाला दूध म्हटलं की दूधवाला भय्या ची अतोनात मेहनत आठवते दुधात पाणी टाकून.गुरांसारखे ओझे वाहून आपल्या पाठीची हातगाडी बनवणारा तो हमाल किंवा माथाडी कामगार हे देखील मराठी नसावेत.आम्हाला फक्त ते परप्रांतीय रात्रपाळी करणारे कामगार दिसतात कारण त्यांचे रूमचे भाडे वाचते फॅक्टरी मध्ये पगारी पाळी केल्यामुळे तीसुद्धा ऑटोमोड वर मशीनरी ठेवून. आणि हे ठरतात मेहनती. आणि वसई /panvel/आसनगाव इथून धक्के खात येणारा आणि अर्धा जीव प्रवासात गमावलेला आमचा चाकरमानी जेव्हा 8–10 तासाची हक्काची ड्युटी करतो तेव्हा त्याला आळशी म्हणून संबोधले जाते.स्वतःची पोटाची खळगी ना भरता मुंबईचे पोट भरणाऱ्या डब्बेवाले हे देखील मराठी नाहीत.सांगली /साताऱ्यातून सोन्याच्या पेढी चालवणारे सांगली /सातारकर मराठी नसावेत.पण आम्हाला फक्त गुजराती हिरे व्यापारीच दिसतात.ग्लॅमर इंडस्ट्री ला चकाकी देणारे पण पडद्याआडून काम करणारे हे देखील मराठी नसावेत.पण आम्हाला फक्त दीपिका मॅडमचे स्त्रीवादी सुविचार फक्त दिसतात.घरोघरी आपल्या संसाराला सांभाळत पापड /लोणच्याची चव जिभेला पुरवणाऱ्या आमच्या माता भगिनींचे घरगुती उद्योग आम्हाला कसे दिसणार.आमहाला फक्त चकाचक मॉल मधील काम करणाऱ्या मिनी मधल्या पोरीची मेहनत दिसते

Comments

Popular posts from this blog

कोळंबी च्या रेसिपी

बिटकॉइन चे फायदे आणि तोटे.