DNA म्हणजे काय?

DNA (DeoxyriboNucleic Acid) ह्याला डिओक्सीरायबोन्यूक्लीक ऍसिड असे म्हणतात. DNA समजून घेण्याचा अगोदर आसान भाषेत त्याचे महत्व समजून घेऊया.

हे आहे मॅगीचे पाकीट! एकूण नूडल्स आणि तो मॅगी मसाला नेमका कशापासून बनलेला आहे त्याचे तपशील येथे दिले आहे. म्हणजे मसाल्यात — काळीमिरी, लसूण, तिखट, मीठ इत्यादी आहे असं.

आता मला सांगा — जर मी मॅगी बनवली तर त्यात "खसखस (Poppy Seeds)" असेल का? तर तुम्ही माझ्या ह्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी मॅगी मसाला नेमका कशापासून बनला आहे ते पाहणार आणि मला सांगणार, "कमलाकर, मॅगीमध्ये खसखस नसेल कारण मसाल्यातच खसखस नाहीये."

म्हणजे मी इथे असं सांगू शकतो कि — हे नूडल्स आणि हा मसाला घेऊन मी त्याला तयार केलं तर मला फक्त तेच घटक मिळतील जे पाकिटावर लिहलेले आहेत. आणि ते मिश्रण योग्य पद्धतीने बनायला सोबत एक "पाककला" इंग्रजीत बोले तो रेसिपी दिलेली असेल. बरोबर…

अगदी असेच = "आपले पूर्ण शरीर हे एक मॅगी म्हणजे एक मिश्रण आहे आणि त्यात कोणते कोणते घटक असतील आणि त्याला कसे बनवायचे ती पाककला ह्याचा तपशीलवार म्हणजे "DNA" होय."


जेव्हा नवीन जीव तयार होतो तेव्हा नर आणि मादाचे DNA मिळून तो तयार होतो. तुमचे आणि तिचे DNA मिळून "ठरवतात" कि पुढचा जीव कसा असेल. हे समजण्यासाठी आपण मोठ्या स्तरावरून लहान स्तरावर येऊ.

सर्वप्रथम येत आपले शरीर — शरीर वेगवेगळ्या अवयवाने बनते — वेगवेगळे अवयव बनतात पेशींच्या ग्रुपमुळे ज्यांना ऊती (Tissue) म्हणतात. ह्या ऊती अनेक पेशी (Cell) मिळून बनलेल्या असतात. - प्रत्येक पेशीमध्ये एक केंद्रक (Nucleus) असते आणि प्रत्येक केंद्रकात DNA चा खूप मोठा गठ्ठा असतो बंडल असतो ज्याला क्रोमोझोम (गुणसूत्र) म्हणतात.


आता नेमकं DNA मध्ये काय असते ते समजून घेऊया.

DNA प्रामुख्याने ४ बेसपासून बनलेला असतो. Adenine (A), Guanine (G), Cytosine (C), and Thymine (T). तर (A) आणि (T) एकमेकांत जुळलेले असतात आणि (G) आणि (C) एकमेकांत जुळलेले असतात. ह्या जुळलेल्या जोडीला बेस पैर (Base Pair) म्हणतात आणि ह्यांना एका शिडीच्या रूपात शुगर-फॉस्पेटचा एक थर जोडून ठेवतो.

  1. आता ह्या A-T,T-A, G-C, C-G ज्यांना बेस पैर म्हणतात त्यांची एका DNA मध्ये संख्या असते सुमारे ६००००००००० अर्थात ६ गुणिले १० चा नववा घात!!
  2. अजून भन्नाट गोष्ट म्हणजे, काही DNA मध्ये काही जोड्या जास्त असतात — तर काही कमी — सर्व जोड्या मागे पुढे होतात त्यातून जी शृंखला बनू शकते तिला संगणकसुद्धा मोजू शकत नाही.
  3. आता अशा करोडो DNA चे मिळून असून जास्त क्रोमोजोम्स बनतात. प्रत्येक पेशीत केंद्रक असल्यामुळे शरीरातील एकूण DNA ची लांबी खूप प्रचंड होते.
  4. जर शरीरातील एकूण DNA बाहेर काढून त्याला लांब ओढत गेलं तर जे अंतर होईल त्याने मनुष्य पृथ्वीवरून सूर्यावर ७० वेळा फिरून येईल.

म्हणून, जवळपास ९९% आपले DNA सारखेच असतात परंतु एक DNA दुसऱ्या DNA पासून वेगळा असतो त्याचे कारण आहे ती श्रुंखला… म्हणजे DNA मध्ये A-T,T-A, G-C, C-G च असतात परंतु त्यांची मिळून जी शृंखला तयार होते ते ती युनिक असते.


इथून थोडं नीट वाचा…..

आता हे DNA आपल्या प्रत्येक पेशीमध्ये (Cell) मध्ये असतात. आणि हेच DNA ठरवतात कि पुढचा जीव पुरुष असेल कि स्त्री आणि त्याची शारीरिक आणि मानसिक जडणघडण कशी असेल.

काही महत्वाचे मुद्दे लक्षात घेऊ.

  1. प्रत्येक पेशीत DNA घट्ट स्वरूपात बांधलेले असतात ज्याला गुणसूत्र किंवा क्रोमोझोम म्हणतात.
  2. मानवी शरीरात एका पेशीत २२ गुणसुत्रांची अशी जोडी असते. म्हणजे एका पेशीत एकूण ४४ गुणसूत्र (क्रोमोझोम) असतात आणि १ गुणसूत्र अजून असतो ज्याला "अलोझोम" म्हणतात.
  3. पुरुषांत (X-Y) अशी अलोझोमची जोडी असते ज्यात एक X गुणसूत्र असते तर दुसरे Y….. ह्याउलट स्त्रियांमध्ये अलोझोमची जोडी (X-X) अशी राहते म्हणजे दोन्ही X गुणसूत्रं असतात.

पुरुषांतील (X-Y) आणि स्त्रियांमधील (X-X) ह्या अलोझोमच्या जोडीवरून पुढे जन्माला येणारा जीव पुरुष असेल कि स्त्री हे ठरते. ते असे:

शुक्राणू जवळ २२ गुणसूत्र आणि (X-Y) अलोझोममधून एकतर X गुणसूत्र येते नाहीतर Y गुणसूत्र येतं. म्हणजे एकतर शुक्राणू इतर गुणसूत्रांसोबत X गुणसूत्र घेऊन पुढे जातो किंवा Y गुणसूत्र…

ह्याउलट, दुसरीकडून येणारे बीज आईकडून २२ गुणसूत्रं सोबत फक्त X गुणसूत्र घेऊन येत. कारण स्त्रियांच्या पेशीत फक्त X अलोझोम असतात.

आणि ह्या X- Y किंवा X-X च्या जोडीवरून नवीन बाळ मुलगा असेल कि मुलगी ते ठरतं.

वरील चित्र नीट निरीक्षण केले असता लगेच समजेल. म्हणजे मुलगा जन्माला येईल कि मुलगी हे कोणाच्याही हातात नसते — स्त्रीच्यातर बिलकुल नाही. कारण मुलगा - मुलगी असा भेद पुरुषांकडून येणाऱ्या (X-Y) ह्या अलोझोमवर अवलंबून असतो.


होणारे बाळ कोणासारखे दिसेल — केसांचा रंग - उंची - आवाज पासून त्याला एखादा आजार पुढे जाऊन होईल का हे वडिलांकडून मिळालेले २२ गुणसूत्र आणि आईकडून मिळालेले २२ गुणसूत्रं ह्यांच्यावर ठरते.

  1. "फक्त सशक्त निसर्गात टिकतो" ह्या तत्वानुसार आईवडिलांकडून आलेले जे २२ गुणसूत्रं असतात त्याच्यामध्ये आईवडिलांचे जे महत्वाचे वैशिष्टये असतात तेच पुढे येतात.
  2. म्हणजेच दोघांचा रंग जर सावळा असेल तर त्यांच्याकडून मिळणाऱ्या गुणसूत्रातसुद्धा "सावळ्या रंगाची माहिती" अधिक प्रमाणात आढळेल. जेव्हा हे २२-२२ गुणसूत्र मिळून एकूण ४४ होतील तेव्हा त्यात सावळ्या रंगाची एनकोडिंग जास्त प्रमाणात होते. परिणामी होणारे बाळ देखील सावळ्या रंगाचे राहील.
  3. अगदी असेच आईच्या गुणसूत्रातून "केसाचा रंग" ह्याबद्दल माहिती येईल जी वडिलांच्या गुणसूत्रातून "केसाचा रंग" असलेल्या माहितीशी जोडली जाईल. जर वडिलांच्या माहितीचे प्रमाण (Replications) जास्त असेल तर एकूण मिश्रणात वडिलांची माहिती जास्त प्रमाणात जोडली जाईल परिणामी होणाऱ्या बाळाला वडिलांच्या केसांचा रंग मिळेल.

थोडक्यात, वडिलांकडून मिळालेल्या २२ आणि आईकडून मिळालेल्या २२ गुणसूत्रावरून - एकूण मिश्रणात कोण जास्त डॉमिनेट करतं ते ठरतं आणि तसे वैशिष्टये बाळाला मिळतात. आणि मी जस सर्वप्रथम सांगितले तसे मग, नवीन बनलेल्या ४४ गुणसूत्रे केंद्रकात येतात — मग पेशी — मग ऊती - मग अवयव मग शरीर………

म्हणजे आपले शरीर मॅगी झाले, आणि इकडून जाणारे २२ गुणसूत्रं आणि तिकडून येणारे २२ गुणसूत्र हे मॅगीचे मुख्य घटक झाले आणि एकमेकांचे प्रमाण - ती शृंखला तुमची "रेसिपी" झाली…..

Comments

Popular posts from this blog

कोळंबी च्या रेसिपी

मुंबई मधील मराठी माणूस

बिटकॉइन चे फायदे आणि तोटे.