चीन मध्ये कोरोना का नाही?
जगातील सर्वात जास्त लोकसंख्या (सुमारे १४७ कोटी) असलेल्या चीनच्या वुहान या ८४ लाख लोकसंख्या असलेल्या शहरात कोवीड-१९ या विषाणूजन्य (viruses) आजाराची सुरूवात झाली. सन २०१९च्या उत्तरार्धात वुहान शहरात निर्माण झालेला कोवीडचा हा विषाणू मार्च २०२१ पर्यंत जवळपास सबंध जगभर पोहचला व लोक प्लेगच्या उंदरांसारखे पटापट मरायला लागले व कमाल म्हणजे तो विषाणू चीनच्या बिजींग, शांघाय या मोठ्या शहरांच्या वाटेला मात्र अजीबात गेला नाही!!? शांघाय हे चीनचे सर्वात मोठे व जगातील तीन नंबरची मोठी लोकसंख्या (सुमारे २.७कोटी ) असलेले शहर हे वुहान पासून फक्त ८१० किमी अंतरावर आहे. वुहान व शांघाय या शहरांदरम्यान रोज ३० फास्ट ट्रैक रेल्वेगाड्या धावतात तरीदेखील कोरोना विषाणूचा फैलाव शांघाय शहरात नगण्य झाला व याच काळात तो विषाणू जहाजे व विमान प्रवाशांच्या मार्गे जगाच्या कानाकोपऱ्यात पसरला! कमाल आहे! कमाल!! असे होने कसे शक्य आहे? यापेक्षाही जास्त कमालीची गोष्ट म्हणजे आकारमानाने व लोकसंखेच्या दृष्टीने चीनला आपण हत्ती म्हटले, तर त्याच्या पाठीवर बसलेल्या मच्छराच्या आकाराच्या देशातील कोरोनाग्रस्तांची व मृतांची संख्या चीनपेक्षा जास्त आहे. असे कसे होवू शकते? हा प्रश्न जगभरातील सर्व देशांच्या प्रमुखांना पडलेला असावा परंतु याचे उत्तर देण्याची जबाबदारी चीन व डब्ल्यू एच ओ.घ्यायला तयार नाहीत.याचात अर्थ असा की 'दाल में कुछ काला है ' अथवा ' सबंध दाल काली है '! या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात येण्यास मदत म्हणून आपल्याला थोडीशी आकडेवारी पहावी लागेल. आकारमान, लोकसंख्या इत्यादी दृष्टीने चीनच्या समकक्ष म्हणून भारत, जगातील एकमेव महाशक्ति असलेली अमेरिका, जगातील सर्वात चांगली समजली जाणारी आरोग्य सेवा उपलब्ध असलेला देश म्हणून युरोपातील, आपल्या राहूल बाबाचे आजोळ असलेला इटली या तीन देशांच्या कोरोना स्थितीची तुलना चीन बरोबर केल्यास आपल्याला एकच प्रश्न पडतो - झि जिनपिंग जवळ अशी कोणती जादूची छड़ी आहे जी इतर कोणाही कडे नाही?.
वरील तक्ता पाहिला म्हणजे एक गोष्ट अगदी स्पष्ट होते ती म्हणजे ज्या देशाने जगाला कोरोनाची भेट दिली त्या चीनमध्ये आत्ताच्या घडीला कोरोना जवळपास नाही सारखाच आहे. हे म्हणजे असे झाले की ज्या घरापासून आगीची सुरुवात होऊन सबंध शहर जडून खाक झाले त्या घरातील खिडक्यांचे पडदे तेवढे फक्त जळाले, बाकी सर्व साबूत! आता हे शक्य झाले कसे हे समजण्यासाठी आगीची सुरुवात म्हणजे वुहान मध्ये तो विषाणू आला कसा व कोठून हे पहायला हवे.
या बाबत हू( WHO) व चीनचे सरकार एक कहानी सांगत आहेत ती अशी- वुहान शहरातील वेट मार्केट (आपली फुले मंडई, फरक एवढाच की वेट मार्केट मध्ये भाजीपाला ऐवजी खाण्याकरिता जीवंत प्राणी व समुद्री खाद्य पदार्थ ठेवलेले असतात) मध्ये एक नामशेष होण्याच्या मार्गावर असलेला जंगली पशु विक्रीसाठी ठेवलेला होता, त्या प्राण्यापासून तो व्हायरस माणसांत संक्रमीत झाला. आता ही गोष्ट मात्र खरी आहे की चीनी लोक अगदी काहीही खातात. उदाहरणादाखल, गेंडा ह्या प्राण्याचा सहवास काळ जवळपास एक तास असतो म्हणून सेक्स पिरियड वाढेल या आशेने चीनी लोक गेंड्यांची शिंगे खातात. तसेच शक्ति वर्धक म्हणून वाघाची हाडे देखील खातात. खरं खोटं ' मावो ' जाणे अथवा 'झि ' जाणे ( देव नाही - चीन साम्यवादी आहे) परंतु माझ्या ऐकण्यात असे आले आहे की उंदरांचे दात खूप तीक्ष्ण असतात म्हणून दात चांगले रहावे याकरिता चीनी लोक उंदरांच्या लेंड्यांचा मुरब्बा करून खातात. असो, काहीही खावूदेत बिचारे , मावो त्यांचे भले करो. बरं, चीनी लोक असे काहीही आताच खायला लागले असेही नाही, हजारो वर्षांपासून हे चालत आलेली प्रथा आहे. मग प्रश्न असा आहे की जो प्राणी विलुप्त होण्याच्या मार्गावर जाण्या इतपत खाल्ला गेला,त्याच्या पासून तो विषाणू आताच कसा माणसांत संक्रमीत झाला? माझ्या तरी बुद्धीला हे पटत नाही!
आणि हा निव्वळ योगायोग समजायचा काय की ज्या वुहान मध्ये कोरोनाची सुरूवात झाली त्याच वुहान मध्ये चीनची एक सर्वात मोठी मायक्रोबायोलाॅजी प्रयोगशाळा आहे?
दुसरी शक्यता ही आहे की त्या प्रयोगशाळेतील एखाद्या प्रयोगादरम्यान तो विषाणू बाहेर पडला व त्याने अगदी अनपेक्षित महामारीचे रूप धारण केले. असे असेल तर जगाला त्याची कल्पना देण्याऐवजी चीनने चार सहा महिने लपवाछपवी करण्याचे कारण काय?
अमेरिकेला मागे टाकून जगातील सर्वात मोठी आर्थिक, औद्योगिक व सामरिक महाशक्ति बनण्याची चीनची महत्वाकांक्षा जगापासून लपून राहिलेली नाही. आपली महत्वाकांक्षा पुर्ण करण्यासाठी चीन कोणत्याही स्तरावर जावू शकतो हे आपण जाणून आहोत. त्यामुळे चीन मुद्दामहून असा विषाणू सोडणारच नाही असे आपण म्हणू शकत नाही. तरी देखील प्राप्त परिस्थितीत चीनने कोवीडचा विषाणू निर्माण करून मुद्दाम लिक केला असेल असे म्हणणे व्यावहारिक वाटत नाही. चीनला असेच करायचे असते तर त्यांनी तो प्रयोग दुसऱ्या देशात करून उलट तो विषाणू तेथून चीनमध्ये पोचला असा कांगावा केला असता ( कांगावा करण्यात सर्व देशोदेशीचे साम्यवादी पटाईत असतात, हे सांगणे नलगे)
वरील तक्त्यात आपण पाहिले आहे की जगात कोरोनाग्रस्तांची संख्या प्रत्येक दहा लाख मागे सरासरी २२००० आहे व मृत्यु चे प्रमाण दहा लाख मागे ४५७ आहे . चीन करता हेच आकडे अनुक्रमे फक्त ६३ व ३ आहेत. हे होणे फक्त दोनच प्रकारे संभव होऊ शकते-
१- चीन खरी परिस्थिती व आकडे जगापासून लपवून ठेवतो आहे व तेथे परिस्थिती इतर सर्व जगासारखी वाईट आहे. सरहद्दीवर भारतीय सैनिकांबरोबर झालेल्या हाणामारीत मरण पावलेल्या आपल्या सैनिकांची संख्या व नावे देखील गुप्त ठेवणारा चीनी साम्यवादी हुकूमशहा आपल्या जनतेपासून व जगापासून कोवीडची खरी परिस्थिती लपवून ठेवायच्या प्रयत्नात असेल, तर त्यात नवल वाटण्यासारखे काही नाही. हुकूमशाही राजवटीत हे शक्य असले तरी देखील सामाजिक प्रसारमाध्यमांच्या या जमान्यात तशी शक्यता कमी वाटते. मग शिल्लक राहते फक्त एक शक्यता. -
२- वुहान शहरातील त्या प्रयोग शाळेत चीनी शास्रज्ञ जैविक हत्यार तयार करत होते. जैविक हत्यार वापरात आणायचे तर त्यात एक मोठी समस्या असते,अर्थात कालांतराने ते शस्त्र वापरकर्त्यावर उलटू शकते. आपल्या पुराणात वर्णन केलेले ब्रम्हास्र जसे एकदा सोडले की परत घेता येत नाही, सर्वनाश ठरलेला असतो अगदी तसेच जीवास्राच्या बाबतीत होण्याची पुरेपूर शक्यता असेल तर त्याचा युद्धात वापर करून फायदा काय? मग यावर उपाय काय? उपाय हाच की एखादे जैविक अस्र तयार करतेवेळी त्यावरील उपाय देखील शोधून ठेवून संपूर्ण तयार राहणे ; म्हणजे आपण सुरक्षित राहून शत्रू देशातील जनता व सैनिक मात्र मरले जातील व तेथील संपत्ती, जमीन, नैसर्गिक साधन संपत्ती नष्ट न होता हाती लागतील. रासायनिक व आण्विक अस्रे वापरल्यास साधन संपत्ती नष्ट होते, हा धोका जैविक अस्रे वापरून टाळता येईल. याच कारणामुळे रशिया, अमेरिका वगैरे देशांकडे जैविक हत्त्यारे तयार असतील यात शंका नाही. ज्या प्लेग, देवीचा आजार (small pox) या रोगांचे जगातून उच्चाटन झाल्याचे आपण समजतो त्या रोगांचे कारक जीवाणू काही मोजक्या देशांनी सांभाळून ठेवले आहेत, ते कशाकरिता? त्यांच्या कडून पुढील संशोधनात उपयोग व्हावा हे कारण सांगितले जाते मात्र त्याचा उपयोग जैविक हत्यार म्हणून होणारच नाही याची खात्री कोण देणार? जगातील तथाकथित पुढारलेल्या देशांकडे जैविक अस्रे असतील तर ती आपल्याकडे देखील असलीच पाहिजेत, असे वेडगळ महत्वाकाक्षेने पछाडलेल्या चीनी हुकूमशहाला नक्कीच वाटले असणार. मग यातूनच प्रोजेक्ट कोरोना सुरू झाला असावा. चीनच्या दुर्दैवाने हा प्रोजेक्ट अंतिम टप्प्यात असताना कींवा पुर्ण झाल्यावर अपघाताने त्यातून व्हायरस मुक्त झाला. हा अपघात घडताच लगेच चीनी प्रशासन सावध होऊन कामाला लागले असेल, त्यांच्याकडे प्रतिबंधक उपाय आधीच तयार असावेत म्हणून त्यांना इतक्या झटपट कोरोनावर प्रतिबंध करणे शक्य झाले. अन्यथा काय कारण आहे कि जपान, जर्मनी सारखे शिस्तप्रिय लोकांचे देश, ब्रिटेन, फ्रांस, अमेरिका व इस्राएल सारखे टेक्नोलॉजी मध्ये अग्रेसर देश घायकुतीला आलेले असताना चीनी तेव्हढे कोरोनावर लगाम लावण्यात यशस्वी झाले?
सारांश : वुहान येथील प्रयोगशाळेत जैविक अस्र निर्मिती व त्यावर प्रतिबंधक उपाय यावर संशोधन अंतिम टप्प्यात असताना अपघाताने कोरोना विषाणू मुक्त झाला व सबंध जगात कोरोना ने थैमान घातले असताना चीनने मात्र त्यावर सहज मात केली.
अर्थात याला काही पुरावे नाहीत, तरी देखील तर्कसंगत उत्तर हेच आहे असे मला वाटते. जो पर्यंत चीन मध्ये साम्यवादी हुकूमशाही राजवट आहे तो पर्यंत खरेखोटे समजण्याची शक्यता मुळीच नाही व निकट भविष्यात तरी ती राजवट संपुष्टात येण्याची शक्यता नाही. तेव्हा सध्यातरी तर्क लढवण्याच्या शिवाय आपल्या हातात काही नाही.
( आकडेवारी worldometer कडून ता. ०१-०६-२१ रोजी घेतलेली आहे.)
वंदे मातरम्।
Comments
Post a Comment