इंटरनेट आणी त्रस्त ग्राहक

 

आजकाल संपूर्ण भारतात कुठेही पहा तुम्हाला इंटरनेट चा स्पीड हा 3G लेवल चा दिसेल. उत्कृष्ट सेवा पुरवण्याच्या नावाखाली ग्राहकांची शुद्ध फसवणूक केली जात आहे. कारण 4g च्या नावाखाली 3g खपवतात ही मंडळी. एके काळी 3g( 4g च्या 1 वर्ष आधी ) वर मी विडिओ बघत होतो तेही buffering शिवाय. लाँच झाल्यावर jio खूप फास्ट होता. News वाले तर बोलत होते एका jio वर 4–4 device चालतील. 5 min मध्ये मूवी डाउनलोड होतील. News वाले तर jio ची तारीफ करण्यात थकत च नव्हते. Airtel पण मागे नव्हता. यांचा नेटवर्क हिल टॉप वर /underground /रिमोट एरिया सगळीकडे कसा फुल्ल असतो असे बैलगाडीत पोरीला बसवून सांगायचे. वोडाफोन च छोटंसं कुत्रं पण मालका च्या मागे मागे जायचे. नंतर मालक च गायब झाला आणि आणि आयडिया नावाची नवीन सवत आई घेऊन आले. आता हाल होतात लेकरांचे जेवणाशिवाय (नेटवर्क ).छोटे उस्ताद तर मूठ बंद करून आले (करलो दुनिया मुट्टी मे म्हणत )पण तेच मिट्टी मध्ये गेले.

आता मला सांगा एके काळी आपण सर्वांनी bpl च्या 2g वर रात्री 3gp मूवी 3 तासात डाउनलोड केले आहेत. 3g वर विडिओ कॉल केले आहेत. मग आता 4g ला एक image डाउनलोड व्हायला इतका वेळ का लागतो? Youtube वरील 3g च्या जाहिराती पहा काय होते त्यात. मग आता 4g आल्यावर 3g चा स्पीड कसा गेला आणि 5g येण्याच्या आधी 4g चे स्पीड कमी कसे होतात. Jio fibre येण्यापूर्वी तुम्ही अचानक स्पीड मध्ये डिफरेन्स पाहिला असेल. टॉवर च्या खाली पण एक image डाउनलोड व्हायला 5 min लागतात.

या सर्व technic आहेत मित्रानो या कॉर्पोरेट ची. हा सर्वात मोठा गोलमाल आहे .यालाच कॉर्पोरेट घोटाळा म्हणतात. म्हणूनच privatization वर इतका जोर दिला जात आहे. कारण घोटाळे पण करता येतात. पैसा पण योग्य जागेवर जातो. आणि RTI अंतर्गत चौकशी पण होऊ शकत नाही. आणि privatization मध्ये जास्त पिल्लावळ पण ( कॉर्पोरेट players (oligopoly)) सांभाळायची. फक्त 1 किंवा 2(monopoly) लाडाचे लेक सांभाळायचे आणि बाकीच्या players चे बळी घ्यायचे.

आठवा ते दिवस जेव्हा इन्शुरन्स मध्ये 23 कंपन्या होत्या. टेलिकॉम मध्ये 10 प्लस कंपन्या होत्या. गेल्या कुठे एवढ्या मोठमोठ्या कंपन्या. बँकिंग मध्ये नवीन बॅंक्स एन्ट्री करत होत्या आता सर्व merge होऊन 2–3 बँकाच राहतील.

जागे व्हा. रोजचा GDP/ GDP per capita / inflation rate /gold rate / commodity rate / fuel रेट्स आणि surcharge बघायची सवय ठेवा. RBi repo rate वर लक्ष ठेवा. म्हणजे तुम्हाला सर्व चित्र स्पष्ट होत जातील. Financially littrate व्हा. देव तर हृदयात च असतात पण ते पोटात नसतात. पोटासाठी अर्थशास्त्र आणि शरीरासाठी वैद्य शास्त्र च कामाला येते. बाकी सर्व अंधश्रद्धा. खरी गरज ओळखा.

Comments

Popular posts from this blog

कोळंबी च्या रेसिपी

मुंबई मधील मराठी माणूस

बिटकॉइन चे फायदे आणि तोटे.