चीन मध्ये कोरोना का नाही?
जगातील सर्वात जास्त लोकसंख्या (सुमारे १४७ कोटी) असलेल्या चीनच्या वुहान या ८४ लाख लोकसंख्या असलेल्या शहरात कोवीड-१९ या विषाणूजन्य (viruses) आजाराची सुरूवात झाली. सन २०१९च्या उत्तरार्धात वुहान शहरात निर्माण झालेला कोवीडचा हा विषाणू मार्च २०२१ पर्यंत जवळपास सबंध जगभर पोहचला व लोक प्लेगच्या उंदरांसारखे पटापट मरायला लागले व कमाल म्हणजे तो विषाणू चीनच्या बिजींग, शांघाय या मोठ्या शहरांच्या वाटेला मात्र अजीबात गेला नाही!!? शांघाय हे चीनचे सर्वात मोठे व जगातील तीन नंबरची मोठी लोकसंख्या (सुमारे २.७कोटी ) असलेले शहर हे वुहान पासून फक्त ८१० किमी अंतरावर आहे. वुहान व शांघाय या शहरांदरम्यान रोज ३० फास्ट ट्रैक रेल्वेगाड्या धावतात तरीदेखील कोरोना विषाणूचा फैलाव शांघाय शहरात नगण्य झाला व याच काळात तो विषाणू जहाजे व विमान प्रवाशांच्या मार्गे जगाच्या कानाकोपऱ्यात पसरला! कमाल आहे! कमाल!! असे होने कसे शक्य आहे? यापेक्षाही जास्त कमालीची गोष्ट म्हणजे आकारमानाने व लोकसंखेच्या दृष्टीने चीनला आपण हत्ती म्हटले, तर त्याच्या पाठीवर बसलेल्या मच्छराच्या आकाराच्या देशातील कोरोनाग्रस्तांची व मृतांची संख्या चीनपेक...