इंटरनेट आणी त्रस्त ग्राहक

आजकाल संपूर्ण भारतात कुठेही पहा तुम्हाला इंटरनेट चा स्पीड हा 3G लेवल चा दिसेल. उत्कृष्ट सेवा पुरवण्याच्या नावाखाली ग्राहकांची शुद्ध फसवणूक केली जात आहे. कारण 4g च्या नावाखाली 3g खपवतात ही मंडळी. एके काळी 3g( 4g च्या 1 वर्ष आधी ) वर मी विडिओ बघत होतो तेही buffering शिवाय. लाँच झाल्यावर jio खूप फास्ट होता. News वाले तर बोलत होते एका jio वर 4–4 device चालतील. 5 min मध्ये मूवी डाउनलोड होतील. News वाले तर jio ची तारीफ करण्यात थकत च नव्हते. Airtel पण मागे नव्हता. यांचा नेटवर्क हिल टॉप वर /underground /रिमोट एरिया सगळीकडे कसा फुल्ल असतो असे बैलगाडीत पोरीला बसवून सांगायचे. वोडाफोन च छोटंसं कुत्रं पण मालका च्या मागे मागे जायचे. नंतर मालक च गायब झाला आणि आणि आयडिया नावाची नवीन सवत आई घेऊन आले. आता हाल होतात लेकरांचे जेवणाशिवाय (नेटवर्क ).छोटे उस्ताद तर मूठ बंद करून आले (करलो दुनिया मुट्टी मे म्हणत )पण तेच मिट्टी मध्ये गेले. आता मला सांगा एके काळी आपण सर्वांनी bpl च्या 2g वर रात्री 3gp मूवी 3 तासात डाउनलोड केले आहेत. 3g वर विडिओ कॉल केले आहेत. मग आता 4g ला एक image डाउनलोड व्हाय...